Pune Metro
Pune MetroX

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! १०० रुपयांत आता कुठेही, कधीही फिरता येणार; Pune Metro ची मोठी घोषणा

Pune Metro News : पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत पुणे मेट्रोने फक्त १०० रुपयांत अमर्यादित प्रवास करणे शक्य होणार आहे.
Published on

Pune News : पुण्याचा विकास आणि विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात नोकरी, शिक्षण यांसारख्या गोष्टींसाठी अनेकजण स्थलांतर करत असतात. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे मेट्रो हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. पुणे मेट्रोशी संबंधित नवी माहिती समोर आली आहे. पुणे मेट्रोने नागरिकांसाठी अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यानुसार १०० रुपयांमध्ये पुणेकरांनी अमर्यादित प्रवास करता येणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी १०० रुपयांचा दैनिक पास ही संकल्पना साकारली आहे. हा पास वापरुन प्रवासी पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर अमर्यादित प्रवास करु शकणार आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या या पर्यायाचे कौतुक होत आहे. विद्यार्थी, नोकरदार वर्गाला याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. यामुळे पैसे आणि वेळ दोन्हींची बचत होईल असा विश्वास मेट्रो प्रशासनाला आहे.

Pune Metro
पुणेकरांसाठी खुशखबर! वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार, रिंग रोड प्रकल्पाबाबत आली मोठी अपडेट

पुणे शहरातील वाढत्या विस्तारात आणि वेळेवर प्रवासाच्या गरजेमध्ये, पुणे मेट्रोने नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे. केवळ १०० रुपयांमध्ये ‘दैनिक पास’ उपलब्ध करून दिल्याने, प्रवाशांना पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर अमर्यादित प्रवास करता येणार आहे. हा निर्णय पुणेकरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे, कारण यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुखकर, वक्तशीर आणि परवडणारा होणार आहे.

Pune Metro
Vaishnavi Hagawane प्रकरणातील फरार आरोपी 'राजेंद्र हगवणे' कोण आहेत?

१०० रुपयांच्या दैनिक पासमुळे मेट्रो स्थानकांच्या मध्ये अमर्यादित वेळा आत किंवा बाहेर पडण्याची मुभा मिळेल. प्रवाशांना दोन स्थानकांदरम्यान एकापेक्षा जास्त वेळा प्रवास करता येईल. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी देखील दैनिक पासच्या पर्यायाचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती देखील दिली आहे.

Pune Metro
Hagawane Family : फक्त सुनाच नाहीतर वडिलांनाही सोडलं नाही, राजेंद्र हगवणेने विकृतीची सीमाच गाठली

पुणे मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा फक्त पुणेकरांनाच नाही, तर पर्यावरणाला देखील होईल असे म्हटले जात आहे. १०० रुपयांच्या पासमुळे अधिकाधिक लोक मेट्रोने प्रवास करतील, त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होईल. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील काही प्रमाणात मार्गी लागेल असे म्हटले जात आहे.

Pune Metro
Vaishnavi Hagawane : सासरच्यांकडून होणारा छळ नाही, तर वैष्णवीचं सर्वात मोठं दु:ख 'हे' होतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com