Delhi News Saam Tv News
देश विदेश

Shocking: 'राजश्री पान मसाला'च्या मालकाच्या सुनेची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण...

Delhi News: दिल्लीमध्ये प्रसिद्ध व्यावसायिकाच्या सुनेने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. राजश्री पान मसालाचे मालक कमल किशोर यांच्या घरी ही घटना घडली. पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.

Priya More

Summary -

  • दिल्लीतील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबात एक धक्कादायक घटना घडली

  • 'कमला पसंद' आणि 'राजश्री पान मसाला'चे मालक कमल किशोर यांच्या सुनेची आत्महत्या

  • दिप्ती चौरसिया यांनी राहत्या घरी केली आत्महत्या

  • आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी कोणावरही आरोप केलेला नाही

दिल्लीतील प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबात धक्कादायक घटना घडली. कमला पसंद आणि राजश्री पान मसाल्याचे मालक कमल किशोर यांच्या सुनेने आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दिप्ती चौरसिया (४० वर्षे) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी संध्याकाळी राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी दिप्ती यांनी सुसाईड नोट लिहिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, कमल किशोर यांची सून दिप्ती चौरसिया यांनी मंगळवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली. यामध्ये त्यांनी कुणावरही काहीच आरोप केला नाही. दिप्ती चौरसियाच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांनी दिप्ती यांच्या सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

दिप्ती यांचे २०१० मध्ये कमल किशोर यांचा मुलगा हरप्रीत चौरसिया यांच्यासोबत लग्न झाले होते. दिप्ती आणि हरप्रीत यांना १४ वर्षांचा मुलगा आहे. असा आरोप केला जात आहे की, हरप्रीतने दोन लग्न केले होते. हरप्रीत यांची दुसरी बायको साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. वसंत विहार पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना मिळेल १८ लाख एरियर; कसं ते वाचा...

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दुष्काळ भागाची पाहणी करणार

Rajya Sabha : मोठी बातमी! राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, कधी होणार मतदान? वाचा सविस्तर

शेंगदाणे सालीसकट खावेत की साल काढून? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर

Satara Earthquake: साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, घाबरून नागरिक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT