Shocking News: एक्स गर्लफ्रेंडची छेड काढली, नंतर जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न; तरुणीने तरुणाच्या जीभेचा तुकडाच पाडला

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाला एक्स गर्लफ्रेंडला जबरदस्ती किस करणं महागात पडलं. या तरुणीने तरुणाच्या जीभेला असा चावा घेतला की त्याचे दोन तुकडे केले. या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे.
Shocking News: एक्स गर्लफ्रेंडची छेड काढली, नंतर जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न; तरुणीने तरुणाच्या जीभेचा तुकडाच पाडला
Uttar Pradesh Crime Saam tv
Published On

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भयंकर घटना घडली. एका तरुणाने लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडची छेड काढत तिला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या तरुणीने या तरुणाला आयुष्याची अद्दल घडवली. तरुणीने तरुणाच्या जीभेचा तुकडाच पाडला. ही घटना बिल्हौर जिल्ह्यातील दरियापूर गावात घडली. या घटनेची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

बिल्हौर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दरियापूर गावात राहणारी तरुणी चुलीसाठी माती गोळा करण्यासाठी एका तलावावर गेली होती. त्याठिकाणी गावामध्ये राहणारा ३५ वर्षीय तरुण आला. हा तरुण तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड आहे. त्याने आधी तरुणीची छेड काढली. त्यानंतर त्याने तिला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याच्या जीभेचा लचका तोडला. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला कानपूरमधील हॅलेट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Shocking News: एक्स गर्लफ्रेंडची छेड काढली, नंतर जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न; तरुणीने तरुणाच्या जीभेचा तुकडाच पाडला
Crime: एकतर्फी प्रेमातून रक्तरंजित थरार, लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली; तरुणीसह वडिलांवर विळ्याने हल्ला करत...

बिल्हौर पोलिस स्टेशनचे प्रभारी अशोक कुमार सरोज यांनी सांगितले की, दरियापूर येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय तरुणाचे त्याच्या गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तरुणीच्या कुटुंबीयांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे तरुणीने या तरुणासोबत बोलणं बंद केले आण त्याच्यापासून ती दूर राहू लागली. या तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत ठरवले. त्यामुळे तरुण नाराज झाला होता. तो तिला सतत भेटण्याचा प्रयत्न करत होता.

Shocking News: एक्स गर्लफ्रेंडची छेड काढली, नंतर जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न; तरुणीने तरुणाच्या जीभेचा तुकडाच पाडला
Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

सोमवारी दुपारी तरुणी चुलीसाठी माती गोळा करण्यासाठी तलावावर गेली होती. तिला एकटी पाहून तरुण तिथे गेला आणि तो तिची छेड काढू लागला. तिने प्रतिकार केला पण त्याने नकार दिला आणि तिला जबरदस्तीने किस करू लागला. या वेळी तरुणीने तरुणाची जीभ दातांनी तोडली. तरुणीने तरुणाच्या जीभेचा इतक्या जोरात चावा घेतला की त्याचे दोन भाग झाले.

परिसरातील ग्रामस्थांनी ही घटना पाहिली. त्यांनी जखमी तरुणाच्या कुटुंबाला माहिती दिली. तरुणाच्या कुटुंबाने त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचार दिल्यानंतर डॉक्टरांनी त्याला कानपूरमधील हॅलेट रुग्णालयात हलवण्यास सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Shocking News: एक्स गर्लफ्रेंडची छेड काढली, नंतर जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न; तरुणीने तरुणाच्या जीभेचा तुकडाच पाडला
Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, ऊसतोड कामगाराचं भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com