Gauri Garje Death Case: माझ्या मुलीला मारलंय; आत्महत्या नाही तर हत्याच, गौरीच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Gauri Garje Suicide Case: मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केलीय. वरळी येथील घरात त्यांचा मृतदेह आढळला होता. आता गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबियांवर खून केल्याचा आरोप केला आहे.
Dr. Gauri Garje
Gauri Garje’s family alleges murder after her suspicious death in WorliSaam TV
Published On

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी मुंबईच्या वरळीमध्ये आत्महत्या केली होती. यानंतर आज कुटुंबीयांनी थेट पत्रकार परिषद घेऊन अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केलेत. गौरीनं आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आलीय. तिच्या मानेवर मारहाणीच्या खुणा आहेत. जर गुन्हा केला नाही तर अनंत गर्जे गायब का झाला? असा सवाल गौरीच्या कुटुंबियांनी केलाय.

Dr. Gauri Garje
Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आकाश पालवे यांनी केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना उर भरून आला होता. भरललेल्या कंठाने ते आपल्या मुलीसाठी न्याय मागत होते. एका लग्न समारंभात असताना आम्हाला गौरीनं आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. आधी आम्हाला फोन आला तेव्हा गौरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. काहीतरी विषारी पदार्थ खात आहे. त्यावेळी मी तिच्याशी बोलतो असं सांगितलं. त्यानंतर फोन बंद केला.

Dr. Gauri Garje
Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

त्यानंतर पुन्हा फोन आला, त्यात त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीचा मृतदेह पडलाय, असं त्यांनी सांगितलं. पण माझी मुलगी चांगल्या नोकरीला होती, महिना १ लाख रुपये पगार कमवत होती. ती आत्महत्या करणारी नव्हती. जरी तिला प्रवृत्त केलं असेल तरी ती आत्महत्या करू शकत नाही. तिची हत्याच झालीय, असा आरोप गौरीचे वडील आकाश पालवे यांनी केलाय. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. मला अजून पोलिसांकडून स्पॉट पंचनामा मिळाला नाहीय. तेथे एकही त्यांचा एकही नातेवाईक उपस्थित नव्हता. यावेळी गौरीचे वडील यांनी माध्यमांना विनंती केली, की चुकीची माहिती देऊ नका, जे सत्य आहे ते सांगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com