Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

Gauri Palve News : गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेचा पीए आणि गौरीची पती अनंत गर्जेला अटक करण्यात आलीय... मात्र डॉ. गौरी पालवेनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. पालवे कुटुंबियांनी काय आरोप केलेत ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Gauri Palve
Gauri Palve News Saam tv
Published On

एका बापाचा हा आक्रोश ....पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉ गौरी पालवेंनी वरळीतल्या राहत्या घरात आत्महत्या केली... मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.. आणि आक्रमक झालेल्या गौरीच्या नातेवाईकांनी थेट अनंत गर्जेंच्या घरासमोरच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

दुसरीकडे गौरी पालवेंच्या आत्महत्या प्रकरणात कुटुंबियांनी केलेल्या आरोपामुळे अनंत गर्जेंना वरळी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली... त्यामुळे अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंवर टीका करत... पीएवर कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित केलाय.. तर दमानियांना पंकजा नावाची कावीळ झाल्याचा पलटवार प्रकाश महाजन यांनी केलाय...

Gauri Palve
Accident : क्षणात होत्याचं नव्हतं, प्रवाशांनी भरलेल्या दोन बसची समोरासमोर धडक; ६ प्रवाशांचा मृत्यू

अनंत गर्जेंच्या बाहेरील संबंधांमुळे गौरी पालवेनं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोपही गौरीच्या नातेवाईकांनी केलाय... त्यामुळे डॉ. गौरीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली? याचा निष्पक्षपणे तपास होणं गरज आहे.

Gauri Palve
ZP Election : जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? आरक्षणाच्या सुनावणीचा निवडणुकीला फटका? VIDEO

आधीच वाल्मिक कराडच्या अटकेनंतर पंकजा मुंडेंवर टीका केली जातेय. त्यात आता ज्याला मुलगा म्हटलं त्याचं पीएला ही पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी अटक झाली असल्यानं पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेतात..हे पाहणं महत्त्वाचं आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com