Dhirendra Krishna Shastri Saam Digital
देश विदेश

Dhirendra Shastri News: चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना मोक्ष मिळाला, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं वक्तव्य

Mahakumbh Mela Stampede Incident: बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच एक विधान केलं, ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Bhagyashree Kamble

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच एक विधान केलं, ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाकुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'प्रत्येकाला एक दिवस मरणाला सामोरे जायचे आहे. जी व्यक्ती गंगेच्या तीरावर श्वास सोडेल, ती व्यक्ती मरणार नाही, तर, त्यांना मोक्ष मिळेल, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते. याच विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

एका व्हिडिओमध्ये बागेश्वर बाबा जनतेला आवाहन करत म्हणाले, 'चेंगराचेंगरीच्या घटनेवर राजकीय वक्तव्य करणाऱ्यांना सद्‍बुद्धी द्यावी, अशी आम्ही प्रार्थना करतो. या घटनेवर कोणतेही राजकारण होऊ नये. परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली आहे. भाविकांना आवाहन आहे हा महाकुंभ आहे. म्हणून संयमाने संगमात डुबकी मारा. स्वत:ची काळजी घ्या'.

दरम्यान, सोशल मीडियावर बागेश्वर बाबांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. धीरेंद्र शास्त्री म्हणाले, 'या घटनेवर तुमचे मत काय, असे विचारण्यात आले, तर मी म्हणालो, या देशात दररोज लोक मरत आहेत. काही लोकांना औषधविना आपले प्राण गमवावे लागत आहेत. काही लोक आरोग्य सेवेविना मरत आहेत. ही घटना नक्कीच निषेधार्थ आहे. पण एक गोष्ट सांगता येईल'.

'मरण सगळ्यांनाच येणार आहे. एक दिवस सगळ्यांनाच मरायचं आहे. मात्र, जो कुणी गंगेच्या किनारी प्राण सोडेल, ती व्यक्ती मरणार नाही, तर त्याला मोक्ष मिळेल', असं बागेश्वर बाबा म्हणाले. ते पुढे म्हणाले, 'इथे कुणी मरण पावले नाही. कुणी अकाली निघून गेले तर, त्याचं नक्कीच दु:ख आहे. पण सर्वांनाच एक न एक दिवस जावे लागेल. काही आधी गेले काही नंतर जातील. ज्यांनी या ठिकाणी प्राण सोडले, त्यांचा मृत्यू नाही, त्यांना मोक्ष मिळाला आहे'. असं बागेश्वर बाबा म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

SCROLL FOR NEXT