EVM Mock Poll: येवला मतदारसंघात २४ फेब्रुवारीला मॉक पोल, माणिकराव शिंदे यांनी ईव्हीएम यंत्रावर घेतला होता आक्षेप

EC Orders Mock Poll Yeola: येवला विधानसभा मतदारसंघातील एका मतदारकेंद्रावरील ईव्हीएमवर मॉलपोल घेतला जाणार असून, याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी शशीकांत मंदरूळे यांनी दिली आहे.
nashik mockpoll
nashik mockpollSaam Tv News
Published On

विधानसभा निवडणुकीत अनेकांचा दारूण पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने येवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अॅड. माणिकराव शिंदे यांनी ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. तसेच फेरमतमोजणीसाठी मागणी केली. फेरमतमोजणीच्या मागणीवर निवडणूक आयोगाने दिलेला पर्याय मान्य केल्यानं येत्या २४ फेब्रुवारीला विधानसभा मतदारसंघातील एका मतदारकेंद्रावरील ईव्हीएमवर मॉकपोल घेतला जाणार आहे.

येवला विधानसभा मतदारसंघातील एका मतदारकेंद्रावरील ईव्हीएमवर मॉलपोल घेतला जाणार असून, याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी शशीकांत मंदरूळे यांनी दिली आहे. राज्यात विधानसभा २०२४ च्या निवडणुकांमध्ये अनेकांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. अनेक नेत्यांनी ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता.

nashik mockpoll
Nagpur News: असला कसला राग? वाढदिवस साजरा करत नसल्यामुळे चिडला, १० वर्षांच्या मुलानं घर सोडलं

दरम्यान, यानंतर अॅड. माणिकराव शिंदे आणि बंडूकाका बच्छाव यांनी फेरमतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे पैसे भरून अर्ज दाखल केला होता. अॅड. माणिकराव शिंदे यांच्या मागणीनुसार निवडणूक निकालाने दिलेला पर्याय मान्य केल्यानं २४ फेब्रुवारीला मॉकपोल घेतला जाणार आहे.

nashik mockpoll
Mumbai Nashik Highway: कसारा घाटात बसचा थरारक अपघात, मिनी बस ३ वेळा पलटली; २१ जण गंभीर जखमी

२४ फेबुवारी म्हणजेच सोमवारी हा मॉकपोल घेतला जाणार असून, तपासणीसाठी त्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना बोलवले जाणार आहे. सध्या येवला मतदारसंघातील सर्व ईव्हीएम हे नाशिकच्या सय्यद पिंप्री येथील निवडणूक शाखेच्या गोदामात सील करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथे मॉकपोल घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ८ वाजता हा मॉकपोल घेण्यात येणार असून, हे मतदान सांयकाळपर्यंत सुरू राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com