Dheeraj Wadhawan Arrested Saam Tv
देश विदेश

DHFL: 34000 कोटींच्या बँक घोटाळ्या प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, DHFL चे माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक

DHFL Bank Scam: धीरज वाधवनला अटक करत दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

३४००० कोटींच्या बँक घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवन यांना अटक केली. धीरज वाधवनला अटक करत दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे.

डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने सोमवारी रात्री अटक केली. ३४००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. आज त्यांना दिल्ली विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने धीरज वाधवान यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सीबीआयने ३४००० कोटी रुपयांच्या १७ बँकांच्या कन्सोर्टियमच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. देशातील बँकिंग इतिहासातील ही सर्वात मोठी फसवणूक मानली जात आहे. याआधीही सीबीआयने येस बँक घोटाळ्याप्रकरणी धीरज वाधवनला अटक केली होती आणि सध्या ते जामिनावर बाहेर होते आहे. पण आता त्यांना सीबीआयने बँक घोटाळा प्रकरणात अटक केली.

सीबीआयने याप्रकरणी २०२२ मध्ये त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, येस बँक घोटाळा प्रकरणात वाधवनला यापूर्वी एजन्सीने अटक केली होती आणि ते जामिनावर बाहेर होते. सीबीआयने 17 बँकांच्या कन्सोर्टियमद्वारे ३४००० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित डीएचएफएल प्रकरणाची नोंद केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT