PM Modi Gets Emotional: आईच्या निधनानंतर...,गंगा नदीकाठावर पूजेनंतर PM मोदींच्या डोळ्यांत पाणी!

Varanasi Loksabha Election: पीएम मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पीएम मोदींनी दशाश्वमेध घाटावर गंगा नदीची पूजा केली. त्याचसोबत त्यांनी गंगा नदीध्ये स्नान देखील केले.
PM Narendra Modi Emotional
PM Narendra Modi EmotionalSaam Tv

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ते तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पीएम मोदींनी दशाश्वमेध घाटावर गंगा नदीची पूजा केली. त्याचसोबत त्यांनी गंगा नदीमध्ये स्नान देखील केले. वाराणसीत गेले असता पीएम मोदींनी इंडिया टुडेला मुलाखत दिली.

या मुलाखतीमध्ये आईच्या आठवणीत पीएम मोदी भावुक झाले. आई हिराबेन यांच्या निधनानंतर गंगानदीशी असलेल्या नात्याचा उल्लेख करत ते भावुक झाले. 'आई गेल्यानंतर गंगामाँने मला दत्तक घेतले.', असे त्यांनी सांगितले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीएम मोदींची आई हिराबेन यांचे २०२२ मध्ये गुजरातमध्ये निधन झाले होते.

पीएम मोदींनी या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'मी अनुभवत होतो की जेव्हा माझ्या पक्षाने मला इथे निवडणूक लढवण्यासाठी सांगितले. तेव्हा माझ्या मनाने आले होते की, गंगामाँने मला बोलावले आहे. पण १० वर्षे माझं इथे जे नातं राहिलं आहे. माझ्या जुन्या जगाशी ते लिंक केले आहे आणि मी पुन्हा एकदा गंगा नदीच्या कुशीमध्ये समाविष्ट झालो.'

तसंच,'मी नेहमी मनामध्ये एक भावना ठेवतो की, गंगा माँने मला दत्तक घेतलं आहे. आई गेल्यानंतर माझ्या मनातील ही भावना जास्त तीव्र झाली. माझ्या रगारगामध्ये आणि माझ्या भावविश्वामध्ये माँ गंगाने त्या रिक्त जागेला भरले आहे.' असे म्हणत पीएम मोदी भावुक झाले. 'मी काशीवासियांचा आभारी आहे. १० वर्षांपूर्वी मी याठिकाणी एक लोकप्रतिनिधी बनण्यासाठी आलो होतो. पण १० वर्षांत या नागरिकांनी मला बघता बघता बनारसी बनवले.', असे त्यांनी सांगितले.

पीएम मोदींनी यावेळी आईच्या आठवणींना देखील उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, 'जेव्ही मी आईच्या १०० व्या वाढदिवशी तिला भेटायला गेलो. तेव्हा तिने मला दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या. लाच घेऊ नका आणि गरिबांना विसरू नका असे तिने सांगितले होते. तसंच, हुशारीने काम कर आणि चांगले जीवन जग असे देखील तिने सांगितले होते.

PM Narendra Modi Emotional
PM Modi Roadshow in Mumbai : पीएम मोदी मुंबईत येणार; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग

दरम्यान, पीएम मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. पीएम मोदींसोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह २० केंद्रीय मंत्री उपस्थित होते.पीएम मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा इथून खासदार झाले. त्यानंतर २०१९ मध्येही ते या मतदारसंघातून निवडणूक जिंकले. आता ते तिसऱ्यांदा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

PM Narendra Modi Emotional
Amit Shah: कलम ३७० ते रामलला दर्शन; अमित शहांनी राहुल गांधींना विचारले ५ प्रश्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com