DHARMENDRA PRADHAN RESIGNS; PRAHLAD JOSHI TAKES CHARGE OF EDUCATION MINISTRY saam tv
देश विदेश

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, नव्या शिक्षणमंत्र्यांची घोषणा; कुणाला मिळाली जबाबदारी?

Dharmendra Pradhan Resigns Prahlad Joshi Education Ministry: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या मोठ्या राजकीय निर्णयामुळे केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचा बदल झाला आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान खात्यांसह शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे प्रल्हाद जोशी आता आपल्या सध्याच्या मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळणार आहेत.

प्रल्हाद जोशींकडे आधीपासूनच ही मंत्रालये

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला मंजूरी मिळाल्यानंतर आता प्रल्हाद जोशी आपल्या मंत्रालयांच्या जबाबदाऱ्यांसोबततच आता शिक्षण मंत्रालायचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. जोशी सध्या अन्न व सार्वजनिक वितरण, ऊर्जा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री आहेत. दरम्यान, राजीनाम्यानंतर प्रधान यांनी राष्ट्रसेवा हीच माझ्या जीवनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे म्हणाले.

राजीनाम्यानंतर त्यांच्या निवासस्थानी नेत्यांची मोठी गर्दी झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी खासदार रमेश बिधुरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, तसेच केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह भाजप आणि एनडीएतील अनेक वरिष्ठ नेते व मंत्री त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘केंद्र-राज्याची कामे सांगा! भरबैठकीत भाजप कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाणांच्या कानपिचक्या

मुलांच्या जीवाशी खेळ! जिल्हा परिषदेच्या शाळेत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार; ठाकरेंच्या शिवसेनेचं स्टिंग ऑपरेशन

GEN -Z करणार 'नवनिर्माण', आता ठाकरेंची भिस्त GEN-Z वर?

कंपन्या बुडाल्य़ा, राजकारण तापलं; चाकणमधून उद्योगांचं स्थलांतर, 36 हजार कंपन्या बंद

Maharashtra News Live Update: शहापूर 80 वा स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून भातसा धरणाला तिरंगी विद्युत रोषणाईने सौंदर्य खुलून निघाले

SCROLL FOR NEXT