

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय करत असतात. कोणी जिममध्ये घाम गाळतं, तर कोणी डाएट फॉलो करतं. पण योग्य आहार आणि लाइफस्टाईलमध्ये छोटे बदल करूनही वजन कमी करता येऊ शकतं. सोशल मिडिया कंटेंट क्रिएटर दीप्तीने तब्बल ३२ किलो वजन केली केल्याचा दावा केलाय.विशेष म्हणजे, तिने यासाठी तिच्या आहारातून काही पदार्थ पूर्णपणे टाळलेत. तिने ९२ किलोवरून ६० किलोपर्यंत वजन कमी केल्याचा अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केला.
दीप्तीने सर्वातआधी साखर असलेले ड्रिंक्स आणि इतर गोड पेये पिणं बंद केलं. त्याऐवजी ती लिंबूपाणी, नारळपाणी आणि ग्रीन टी पित राहिली. कारण साखरयुक्त पेयांमधून शरीरात अतिरिक्त कॅलरीज जाऊ शकतात.
पांढऱ्या ब्रेडऐवजी तिने मल्टीग्रेन ब्रेड, व्होल व्हीट ब्रेड, सॉरडो आणि ओट्सचा आहारात समावेश केला. यामुळे आहारात फायबरचं प्रमाण वाढायला मदत होऊ शकते.
चिप्स आणि इतर पॅकेज्ड पदार्थ खाणं तिने बंद केलं. या पदार्थांमध्ये मीठ आणि कॅलरीज जास्त असू शकतात. त्याऐवजी भाजलेले चणे, मखाणे आणि सुकामेवा खात राहिली.
बर्गर, फ्रेंच फ्राइज यांसारखे तळलेले पदार्थ टाळले. त्याऐवजी घरगुती रॅप्स, पनीर टिक्का, चिकन टिक्का आणि साधं घरचं जेवण पसंत केलं.
रात्री उशिरा विनाकारण स्नॅक्स खाण्याची सवयही तिने सोडली. भूक लागल्यावर हर्बल टी घेणं आणि पुरेशी झोप घेण्यावर तिने भर दिला.
दीप्तीने फक्त आहारात बदल केले नाहीत, तर काही चांगल्या सवयीही लावून घेतल्या.
१. दररोज २ ते ३ लिटर पाणी पिणे.
२. रात्री किमान ७ तास झोप घेणे.
३. नियमित चालण्याचा व्यायाम करणे.
४. आहारातून मिळणाऱ्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवणे.
५. कॅलरी डेफिसिट राखण्यावर लक्ष देणे.
दीप्तीच्या मते, वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅलरी डेफिसिट. म्हणजेच दिवसभरात शरीर जितक्या कॅलरीज खर्च करतं, त्यापेक्षा कमी कॅलरीज आहारातून घेणं. मात्र, वजन कमी करण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
टीप: हा अनुभव दीप्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रत्येक व्यक्तीचं वजन कमी होण्याचं प्रमाण वेगळं असू शकतं. आहारात मोठे बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.