LPG ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! आता गॅस सिलेंडर उचलण्याचा त्रास संपल, BPCL ची नवी सेवा पाहून ग्राहक खुश

BPCL BharatGas Light ZIP : बीपीसीएलने भारतगॅस ग्राहकांसाठी भारतगॅस लाइट ZIP सेवा सुरू केली आहे. हलका कंपोझिट सिलेंडर, एक्सप्रेस डिलिव्हरी फास्ट कनेक्शन, जास्त सुरक्षा आणि पारदर्शक रचना यामुळे ग्राहकांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
BPCL BharatGas Light ZIP
BPCL BharatGas Light ZIPgoogle
Published On

LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलेंडर असतो. हा सिलेंडर उचलताना होणारा त्रास आता कमी होण्याची शक्यता आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिडेट (BPCL) ने आपल्या भारतगॅस ग्राहकांसाठी भारतगॅस लाइट ZIP ही नवीन प्रिमियम LPG सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना हलका कंपोझिट गॅस सिलेंडर, फास्ट नवीन गॅस कनेक्शन आणि एक्सप्रेस डिलिव्हरीची सुविधा मिळणार आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीचा विचार करून ही सेवा विकसित करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं आहे. सध्या या सेवेची सुरुवात मुंबईत करण्यात आली आहे. बीपीसीएलच्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत ही सेवा देशातल्या २४ राज्यांमध्ये १०० पेक्षा जास्त शहरांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे येत्या काही आठड्यांमध्ये लाखो ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळू शकतो.

BPCL BharatGas Light ZIP
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगारात बंपर वाढ; वर्षाला ३% ऐवजी ६% इन्क्रिमेंट मिळणार?

या सेवेमध्ये भारतगॅस लाइट कंपोझिट सिलेंडर हे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये स्टील सिलेंडरच्या तुलनेत हा सिलेंडर जास्त हलका असल्यामुळे तो घरातल्या कोणालाही सहज उचलता येतो. याशिवाय या सिलेंडरला गंज लागत नाही, त्यामुळे त्याचा वापर जास्त वेळ करू शकतो. सिलेंडरची योग्य रचना असल्यामुळे त्यामध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे ग्राहकांना सहज पाहता येतं. तसेच जास्त सुरक्षा असल्यामुळे हा सिलेंडर जास्त सुरक्षित मानला जातो.

तसेच, एलपीजी क्षेत्रात ग्राहकांना जास्त चांगली सेवा देण्यासाठी सरकारी तेल कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढलेल्या आहेत. याआधी हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) ने सु्द्धा हलका कंपोझिट सिलेंडर आणि फास्ट डिलिव्हरीची सुविधा सुरू केली होती. त्यामुळे आता ग्राहकांना जास्त आधुनिक आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होत आहेत.

BPCL BharatGas Light ZIP
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगारात बंपर वाढ; वर्षाला ३% ऐवजी ६% इन्क्रिमेंट मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com