

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची समोर आली आहे. सध्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सर्वच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सुरू आहे. आयोगाकडून वेतन, भत्ते आणि सॅलरीच्या रचनेबद्दलच्या शिफारशी तयार करण्याचं काम सुरू आहे. याच वेळेस नॅशनल कॉन्सिल- जॉइंट कन्सल्टेटिव्ह मिशनरी (NC-JCM) या कर्मचारी संघटनेने वेतनाच्या आयोगासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
संघटनेने सध्याच्या पे - लेव्हलमध्ये बदल करून काही स्तर एकत्र करण्याची मागणी केली आहे. यामध्ये लेव्हल २ आणि ३, लेव्हल ४ आणि ५, लेव्हल ७ आणि ८ तसेच लेव्हल ९ आणि १० एकत्र करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या मते, या स्तरांमधल्या कर्मचाऱ्यांच्या कामात आणि वेतनात फारसा फरक नसतो. त्यामुळे वेगळे स्तर ठेवण्यापेक्षा एकत्र केल्यावर सॅलरीचीरचना जास्त सोपी होईल.
याशिवाय, सध्या लेव्हल ५ मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकदाच लेव्हल ६ मध्ये अपग्रेड करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रेल्वे, टपाल, संरक्षण आणि केंद्रीय सचिवालयातल्या अनेक कर्मचारी अनेक वर्षांपासून त्याच स्तरावर असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.
NC-JCM ने बेसिक सॅलरी ६९,००० रुपये करण्याची मागणी केली आहे. तसेच सध्या मिळणारी ३ टक्के वार्षिक सॅलरीतली वाढ ६ टक्के करण्याचाही प्रस्ताव दिलेला आहे. यासोबत महागाईशी जोडलेले वेतन मॉडेल, एकसमान पे - मॅट्रिक्स आणि पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.