Bank Holidays: खातेधारकांनो लक्ष द्या! या आठवड्यात ३ दिवस बँका राहणार बंद, पण कधी?

Bank Holidays in This Week: RBI च्या जुलै २०२६ सुट्टीच्या कॅलेंडरनुसार पुढच्या आठवड्यात तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. कोणत्या दिवशी सुट्टी असेल, ऑनलाइन सेवा सुरू राहतील का आणि कामाचे नियोजन कसे करावे ते जाणून घ्या.
Bank Holiday July 2026
Bank Holiday July 2026google
Published On

तुम्ही बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण जूनच्या चौथ्या आठवड्यात वेगवेगळ्या भागात ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. जर तुमचे HDFC, SBI, PNB सह कोणत्याही खाजगी किंवा सरकारी बँकेत काम असेल तर कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी असेल हे जाणून घेणं गरजेचं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून सुट्ट्यांची यादी जाहीर झालेली आहे.

RBI ने जाहीर केलेल्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार २० जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत देशातल्या काही भागांमध्ये बँका एकूण तीन दिवस बंद राहणार आहेत.पुढीलप्रमाणे याची यादी असणार आहे.

Bank Holiday July 2026
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

२२ जुलै बुधवार

२२ जुलै रोजी त्रिपुरा राज्यामध्ये खर्ची पूजा हा स्थानिक सण असतो. त्यानिमित्ताने बँकांना सुट्टी असणार आहे. पण ही सुट्टी फक्त त्रिपुरापुरती मर्यादित असल्यामुळे देशातल्या इतर राज्यांमध्ये बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.

२५ जुलै शनिवार

२५ जुलै रोजी चौथा शनिवार असेल. आरबीआयच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी देशभरातल्या सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद असतात. त्यामुळे या दिवशी बँका बंद राहणार आहेत.

२६ जुलै रविवार

२६ जुलै हा रविवार असल्यामुळे देशभरातल्या सर्वच बँका बंद असणार आहेत. तर २० जुलै सोमवार, २१ जुलै गुरुवार आणि २४ जुलै शुक्रवार या दिवशी बऱ्याच राज्यांमध्ये बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे या दिवशी ग्राहकांना बँकेची कामे करता येतील.

Bank Holiday July 2026
Blood Pressure: हाय बीपीचा धोका टाळण्यासाठी शरीराचे हे 'साइलेंट' सिग्नल वेळीच ओळखा, नाहीतर...

ऑनलाइन सेवा सुरूच असणार

बँकांना सुट्टी असली तरी ग्राहकांना टेन्शन घेण्याची गरज नाही. एटीएम सेवा, युपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि ऑनलाइन पैसे पाठवण्याच्या सर्व सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्यामुळे रोख रक्कम काढणे, ऑनलाइन व्यवहार करणं किंवा बिल भरणं यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com