Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Pune Shivsena: ऐन दिवाळीत शेतकऱ्याला घराबाहेर काढणाऱ्या फायनान्स कंपनीविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी घराला लावलेले टाळे तोडून टाकले.

पुण्याच्या दौंड तालुक्यातील शेतकऱ्याच्या घराला फायनान्स कंपनीने लावलेले सील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडून टाकले. फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार दौंड तालुक्यातील शेतकऱ्याच्या घराला सील लावल्यामुळे शेतकऱ्याला कुटुंबासहित ऐन दिवाळीत उघड्यावर राहण्याची वेळ आली. या परिस्थितीमुळे शिक्षण घेत असलेल्या दोन मुलींच्या डोळ्यात अश्रू आहेत. दरम्यान परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा शिवसेना शेतकरी विभागाचे जिल्हाप्रमुख रामदास दोरगे यांनी या कुटुंबाला आनंदाचा शिधा दिलाय. तसेच शिवसेना स्टाईल कार्यकर्त्यांसह शेतकऱ्याच्या घराला लावलेले सील तोडले आहे. फायनान्स कंपनीवर कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.