Delhi Heavy Rain Latest Update:  Saamtv
देश विदेश

Delhi Rain News: दिल्ली- उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार! नाल्यात बुडून माय-लेकाचा मृत्यू, शाळा बंद; आजही 'अलर्ट' जारी

Delhi Heavy Rain Latest Update: राजधानी दिल्लीमध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी सुमारे एका तासात दिल्लीत 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. यानंतर शहरातील अनेक भागात पाणी साचले होते

Gangappa Pujari

दिल्ली, ता. १ ऑगस्ट २०२४

राजधानी दिल्लीसह उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे एकीकडे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असतानाच शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजधानी दिल्लीमध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी सुमारे एका तासात दिल्लीत 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. यानंतर शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. प्रगती मैदान परिसरात 112.5 मिमी पावसाची नोंद झाल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले.

मुसळधार पावसामुळे लुटियन्स दिल्ली, काश्मिरी गेट आणि राजेंद्र नगरसह अनेक भाग जलमय झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी एनएस मार्गावरून येणारी वाहने कोडिया ब्रिज, मोरी गेट बुलेवर्ड रोड मार्गे आयएसबीटी काश्मिरी गेटकडे वळवली. बुधवारी संध्याकाळी दिल्ली विमानतळावर उतरलेली 10 विमाने इतर ठिकाणी वळवण्यात आली.

बुधवारी दिल्लीत मुसळधार पावसानंतर एका २२ वर्षीय महिलेचा आणि तिच्या मुलाचा पाण्याने भरलेल्या नाल्यात बुडून मृत्यू झाला. तसेच आणखी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण जखमीही झाले आहेत. तनुजा आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा प्रियांश हे गाझीपूर भागातील खोडा कॉलनीतील आठवडी बाजारात गेले होते. यावेळी नाल्यात पडून या मायलेकांचा दुर्दैवी अंत झाला.

दरम्यान, आजही शहरात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून लोकांना आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याच्या तसेच खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पावसाचा अंदाज पाहता गुरुवारी शाळा बंद राहतील, असेही दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिशी यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT