Dharashiv News : गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस; तरीही धाराशिव जिल्ह्यातील धरण कोरडीठाक

Dharashiv News : मागील पंधरा दिवसांपासून विदर्भात पावसाने हाहाकार माजविला आहे. पावसाची संततधार असल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे या भागातील नदी, नाले ओसंडून वाहत असून धरण देखील भरले आहेत
Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : राज्यात यंदा आतापर्यंत चांगला पाऊस होत आहे. काही भागात तर मुसळधार पाऊस होत असल्याने धरणाची पातळी देखील वाढली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. दरम्यान जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाऊस झाला असताना देखील जिल्ह्यातील धरण कोरडीठाक पडलेली आहेत. 

Dharashiv News
Pavana Dam : पवना धरणात ८७ टक्के पाणीसाठा; पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, शेतकऱ्यांकडून जलपूजन

मागील पंधरा दिवसांपासून विदर्भात पावसाने हाहाकार माजविला आहे. पावसाची संततधार असल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Rain) पावसामुळे या भागातील नदी, नाले ओसंडून वाहत असून धरण देखील भरले आहेत. पावसाळ्याच्या अधिकृत पन्नास दिवसांमध्ये शासनाच्या अहवालानुसार १६७ मिलिमीटर एवढा पाऊस बरसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस दुप्पट असला तरी धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील धरण मात्र कोरडी ठाक आहेत. राज्यात मान्सूनने हजेरी लावून काही भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी धाराशिव जिल्हा मात्र कोरडाच आहे. 

Dharashiv News
Parbhani News : अतिवृष्टी अनुदानाचे कोट्यवधी अडकले केवायसीत; दोन वर्षांचा मदत निधी पडूनच, लाखांवर शेतकरी वंचित

जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा 

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला आहे. तरी देखील अद्यापपर्यंत सीना कोळेगाव, मांजरा, तेरणा ही धरण कोरडी असल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यंदाचा पावसाळा अर्धा झाला तरी परंडा तालुक्यातील सीना धरण अद्यापही भरले नसल्याने धरण भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com