Pavana Dam : पवना धरणात ८७ टक्के पाणीसाठा; पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, शेतकऱ्यांकडून जलपूजन

Maval News : मावळ तालुक्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जीवनदायनी ठरलेल्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने पवना धरणात ८६.६० टक्के पाणीसाठा झाला आहे
Pavana Dam
Pavana DamSaam tv
Published On


मावळ
 : राज्यातील बहुतांश भागात मागील पंधरवड्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे धरणातील पाणी साथ वाढण्यास मदत झाली आहे. त्यानुसारच पवना धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन ८६.६० टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे किमान आता पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. 

Pavana Dam
Chandrapur Heavy Rain : अतिवृष्टीचा २६ हजार शेतकऱ्यांना फटका; १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मावळ (Maval) तालुक्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जीवनदायनी ठरलेल्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने (Pavana Dam) पवना धरणात ८६.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि नागरिकांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने धरणात मुबलक पाणी साठा न झाल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. मात्र यंदा आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

Pavana Dam
Shocking Video : खळबळजनक! दरोडेखोरांनी अवघ्या २ मिनिटातच लुटले ४० लाखांचे दागिने; लुटमारीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

ओटी भरून पवना नदीचे जलपूजन 

धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने परिसरात व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याचे औचित्य साधत तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पवना माईची ओटी भरून जलपूजन करण्यात आले. यावेळी पवन मावळातील शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com