Chandrapur Heavy Rain : अतिवृष्टीचा २६ हजार शेतकऱ्यांना फटका; १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
चंद्रपूर : राज्यातील अनेक भागात मागील पंधरा दिवसांपासून कुठे मुसळधार तर कुठे पावसाची संततधार पाऊस सुटू होता. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यात गेले दहा दिवस अतिवृष्टी झाल्याने याचा फटका जिल्ह्यातील जवळपास २६ हजार शेतकऱ्यांना बसला आहे. तर १८ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने वर्धा- वैनगंगा- झरपट- उमा- इरई या नद्यांनी पात्र सोडल्याने जिल्ह्यातील शेती खरवडून निघाली. आजवर वार्षिक पर्जन्य सरासरीच्या ७५ टक्के एवढा पाऊस सध्या नोंदविण्यात आला आहे. (Heavy Rain) पावसामुळे जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्प व २ मोठे प्रकल्प तुडुंब भरले असून, त्यातून होणारा विसर्ग देखील शेती खरवडून निघण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. मुख्यत्वे कापूस, सोयाबीन, भात, तूर ही प्रमुख पिके प्रभावित झाली असून भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मत्स्य प्रकल्पांनाही मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यातील कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार २६ हजार शेतकऱ्यांचे (Farmer) १८ हजार हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले असून या सर्वच पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या पंचनामा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासनाला अंतिम अहवाल दिल्यानंतर नुकसान भरपाई दिली जाणार आहे. जिल्ह्याच्या वार्षिक पर्जन्य सरासरीत यंदा जूनमधील पावसाची आकडेवारी १६१ टक्के तर जुलै महिन्यात तब्बल २१३ टक्के एवढा पाऊस नोंदवला गेला आहे. परिणामी नुकसानीचे आकडे देखील मोठे झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.