Akkalkuwa News : महिलेला प्रसूतीसाठी झोळीत बसवून पुराच्या पाण्यातून नेलं; २१ व्या शतकातलं महाराष्ट्रातलं विदारक दृश्य

Nandurbar News : सरकार एकीकडे आदिवासींच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करत असते. मात्र हे पैसे खरंच आदिवासींच्या कामात येतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे
Akkalkuwa News
Akkalkuwa NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : आदिवासी बहुल परिसर असल्याने येथे सुविधा अजूनही पोहचलेल्या नाहीत. रस्त्याअभावी आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही. यामुळे आदिवासी बांधवावर नेहमीच समस्येला सामोरे जावे लागत आहे. यात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी, नाल्याना पूर आहे. यामुळे या पुरातून मार्गक्रमण करावे लागत आहे. दरम्यान गरोदर महिलांना तर झोळीत टाकून न्यावे लागत असल्याचे प्रकार नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने होत आहेत. पुन्हा असाच प्रकार अक्कलकुवा तालुक्यात समोर आला आहे. 

Akkalkuwa News
Drunk And Drive Case : मनमाडला ड्रंक आणि ड्राईव्हचा प्रकार; दुचाकीला धडक, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षकांवर गुन्हा दाखल

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. मात्र (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात आजही सुविधांपासून इथल्या आदिवासी बांधवांना वंचित रहावे लागत आहे. सरकार एकीकडे आदिवासींच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करत असते. मात्र हे पैसे खरंच आदिवासींच्या कामात येतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता नसल्याने महिलेला प्रसूतीसाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली आहे. (Akkalkuwa) अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी, बारीपाडा या गावांना जोडणारा रस्ता नसल्याने नदीतून या गर्भवती महिलेला नेण्यात आले. 

Akkalkuwa News
Buldhana News : कापूस विक्री करूनही अद्याप रक्कम मिळेना; व्यापारी फरार, शेतकऱ्यांचा घरासमोर गोंधळ

सुमित्रा विरसिंग वसावे असे गर्भवती महिलेचे नाव आहे. या महिलेच्या पोटात दुखत असल्याने तीला झोळी करून प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळखुटा येथे दाखल करण्यात आले. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावाचा मुख्य रस्तापासुन बारीपाडा, पाटीलपाडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सदर पाड्यात जाण्यायेण्यासाठी खुप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाड्यांमध्ये जातांना रस्त्यात मोठी दरी आहे. शिवाय नदी नाल्यामधुन जावे लागत असते.  त्यामुळे शासनाने नंदुरबार जिल्ह्यात लक्ष द्यावा अशी मागणी आता होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com