Parbhani News
Parbhani NewsSaam tv

Parbhani News : अतिवृष्टी अनुदानाचे कोट्यवधी अडकले केवायसीत; दोन वर्षांचा मदत निधी पडूनच, लाखांवर शेतकरी वंचित

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२३ नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केला होता
Published on

परभणी : पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असते. निसर्गाच्या लहरीपणामुळे हे नुकसान सहन करावे लागत असते. याचे पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई देण्याची घोषणा शासनाकडून होते. मात्र सदर मदतीची रक्कम शेतकऱ्यांना मिळतच नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसून दोन वर्षांचा निधी पडूनच आहे. 

Parbhani News
Shocking Video : खळबळजनक! दरोडेखोरांनी अवघ्या २ मिनिटातच लुटले ४० लाखांचे दागिने; लुटमारीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

परभणी (Parbhani) जिल्ह्यात २०२३ नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानी पोटी शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केला होता. मात्र हा मदत निधी शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात अजूनही आलेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड न केल्याने अथवा ई केवायसी प्रलंबित असल्याने कोट्यवधीच्या लाभापासून शेतकरी वंचित आहेत. हा निधी अजूनही शासन दरबारी पडून आहे. यात यंदाच्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्याची भरपाई आता कधी मिळेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Parbhani News
Pavana Dam : पवना धरणात ८७ टक्के पाणीसाठा; पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, शेतकऱ्यांकडून जलपूजन

६१ हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड होणे बाकी 

परभणी जिल्ह्याला २०२३ मध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झालेल्या अवेळी (Heavy Rain) पावसामुळे १३० कोटी रुपयांची मदत जाहीर झाली होती. यात २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मात्र यात १ लाख ८६ हजार ७५१ जणांचीच यादी अपलोड झाली आहे. ९७.८९ कोटी रुपयांची त्यांना मदत मिळेल. तर अजून ६१ हजार २०९ जणांची यादीच अपलोड झाली नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com