Delhi bomb blast saam tv
देश विदेश

Delhi Blast: ८ दहशतवादी, ४ शहरं आणि ४ कार... फक्त दिल्लीच नव्हे तर देशाला हादरवण्याचा होता प्लान; तपासातून धक्कादायक खुलासा

Delhi Blast Update: दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Priya More

Summary -

  • दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील स्फोटाच्या तपासातून धक्कादायक खुलासा

  • ८ दहशतवाद्यांचा देशव्यापी स्फोटांचा कट होता

  • या गटाने चार शहरांना लक्ष्य केले होते

  • या स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या स्फोटाला केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याचे म्हटले आहे. तपास यंत्रणांकडून या हल्ल्याचा तपास सुरू आहे. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचा फक्त दिल्लीच नाही तर देशभरातील अनेक शहरांमध्ये मालिका स्फोट घडवून आणण्याचा प्लान होता. ८ दहशतवाद्यांनी चार प्रमुख शहरांना लक्ष्य केले होते. त्यांचा प्लान होता की दोन-दोन ग्रूपमध्ये चार शहरांमध्ये घुसून आयईडी स्फोट करायचा होता.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल, उमर आमि शाहीन यांनी एकत्रित येत जवळपास २० लाख रुपये जमा केले होते. जे दिल्ली स्फोटापूर्वी उमरला देण्यात आले होते. इथूनच याप्रकरणात ट्विस्ट आला. उमर आणि डॉ. मुजम्मिल यांच्यामध्ये पैशावरून भांडण झाले. उमरने सिग्नल अॅपवर २- ४ मेंबर्सचा सिक्रेट ग्रुप बनवला. ऐवढेच नाही तर या दहशतवाद्यांनी गुरूग्राम, नूह आणि आसपासच्या परिसरात २० क्विंटलपेक्षा जास्त एनपीके फर्टिलाइजर खरेदी केला होता. ज्याची किंमत ३ लाखांच्या आसपास होती.

दिल्ली स्फोटाच्या तपासातून ही माहिती समोर आली की, दिल्लीची i20 आणि इकस्पोर्ट्स सारख्या जुन्या कारनंतर हे दहशतवादी दोन आणखी कार तयार करत होते. जेणे करून या गाड्यांच्या आतमध्ये स्फोटकं भरून स्फोट करू शकतील. स्फोटांसाठी वेगळी वाहनं तयार केली जात होती का? याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत. या प्रकरणाच्या तपासातून अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटामध्ये अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. तपास यंत्रणांचा असा अंदाज आहे की, जैश-ए-मोहम्मदच्या एका नव्या मॉड्यूलचे हे काम होते. एनआयएमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम, पोलिस अधीक्षकांची टीम आणि आणखी एक पोलिसांची टीम तयार करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimple Skin Care: हनुवटीवर सतत मुरूमं येतायेत? मग या ६ सवयी टाळा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र|VIDEO

Raigad Politics: रायगडमधील राजकारण फिरलं, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती; शिंदे सेनेला डावलले

Maharashtra Live News Update: काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार केले जाहीर

BMC News : सिंगल-यूज प्लास्टिकवर १००% बंदी, नियम तोडणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई, मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT