Delhi fire news today 
देश विदेश

पॉश एरियात इमारतीमध्ये अग्निकांड, ६ जण जिवंत जळाले, ३ मुलांचा दुर्दैवी अंत

Delhi fire news today : दिल्लीतील पालम भागातील बहुमजली इमारतीला भीषण आग लागून ६ जणांचा जळून मृत्यू झाला, ज्यामध्ये ३ मुलांचाही समावेश आहे. अग्निशमन दल उशिरा पोहोचल्याचा आरोप होत असून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Delhi Palam building fire incident full details : मध्यप्रदेशच्या आर्थिक राजधानीत आगीमध्ये जळून सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच राजधानी दिल्लीमध्येही भीषण आगीची दुर्घटना घडली आहे. राजधानी दिल्लीमधील पॉश एरिया असलेल्या पालममध्ये एका ५ मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत ६ जणांचा जिवंत जळून मृत्यू झालाय. यामध्ये ३ चिमुकल्यांचाही समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, अग्निशमन दलाच्या गाड्या ४५ मिनिटे उशिराने आल्यामुळे जिवितहानी झाल्याचा आरोप केला जातोय. अग्निशमन दल वेळेवर आले असते, तर कदाचीत ६ जणांचा जीव वाचला असता, अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

राजधानी दिल्लीच्या पालम भागातील एका इमारतीला सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत ६ जणांचा जळून कोळसा झाला. काहीजण गंभीररित्या भाजले आहेत. आग लागल्यानंतर पालम परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. आतमध्ये अडकलेल्या लोकांकडून मदतीची मागणी केली जात होती. पण अग्निशमन दलाचे पथक वेळेवर दाखल झाले नाही. ४५ मिनिटे उशीर झाल्यानं ६ जणांचा मृत्यू झालाय. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग नेमकी का आणि कशी लागली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारत परिसरातील पालम कॉलनीच्या गल्ली क्रमांक २ मध्ये आहे. राजेंद्र कश्यप यांचे १५ लोकांचे कुटुंब तिथे राहते. राजेंद्र कश्यप यांच्या मालकीची ही ४ मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर एक ब्युटी पार्लर, बांगड्यांचे दुकान आणि इतर व्यवसाय आहेत. त्यांचे कुटुंब वरच्या मजल्यावर राहते. या इमारतीला नेमकी आग कशामुळे लागली, याची चर्चा परिसरात सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शी योगेशने मीडियासोबत बोलतान या दुर्घटनेबाबत माहिती दिली. योगेश यानं सकाळी ६:४५ वाजता आग लागल्याचे पाहिले. त्याच्या वडिलांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. पण तोपर्यंत आग पूर्ण इमारतीत पोहचली. योगेश म्हणाला की, आग काही वेळात संपूर्ण इमारतीत वेगाने पसरली. बाल्कनीमध्ये सहा ते सात लोक ओरडताना दिसले. पण नंतर ते मागे हटले. धूर खूप दाट होता. ते शेजारच्या इमारतीत घुसले आणि त्यांनी भिंत तोडली. पण आगीमुळे त्यांना आत प्रवेश करता आला नाही.

अग्निशमन दलाच्या हायड्रॉलिक मशीनला उशीर झाला. ते अर्धा तास उशिरा पोहचले. भाजलेल्या सहा ते सात जणांना बाहेर काढण्यात आले. इमारतीत १० हून अधिक लोक अडकल्याची भीती आहे. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एक मूल जीव वाचवण्यासाठी वरून खाल पडले अन् गंभीर जखणी झाले. तर एक व्यक्ती अग्निशमन जिन्यावरून घसरून खाली पडला आणि तोही जखमी झाला. भाजलेल्या पाच ते सहा जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT