Shreya Maskar
१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला भारतातील महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्या. ठिकाणांची यादी आताच नोट करा.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ताजमहल हे ऐतिहासिक ठिकाण आहे. ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
दिल्ली येथे लाल किल्ला आहे. मुघलांनी लाल दगडापासून बांधलेला एक प्रचंड किल्ला पाहायला नक्की जा. स्वातंत्र्यदिनी येथे भारताचा ध्वज फडकवला जातो.
कर्नाटक येथील हंपी हे वास्तुकला आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले ठिकाण आहे. हे ठिकाण प्राचीन विजयनगर साम्राज्याची सत्ता आणि कलात्मक वैभव दर्शवते.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजिंठा- वेरूळची लेणीची परदेशी पर्यटकांनाही भुरळ पडली आहे. खडकांच्या भिंतींमध्ये थेट कोरलेली प्राचीन लेणी आहेत.येथे अप्रतिम प्राचीन शिल्पे आणि चित्रे पाहायला मिळतात.
दिल्ली येथे कुतुब मीनार हे भव्य ऐतिहासिक ठिकाण आहे. ८०० वर्षांहून अधिक काळापूर्वी बांधलेला दगडाचा अत्यंत उंच मनोरा पाहायला पर्यटक गर्दी करतात.
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित भारताचे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वास्तू आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.