Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Mumbai News: मुंबईतील मालवणीमध्ये पोलिसाला ड्रग्ज घेताना रंगेहाथ पकडण्यात आला. यामुळे मुंबई पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ
Mumbai PoliceSaam Tv
Published On
  • मुंबई पोलिस कॉन्स्टेबलला एमडी ड्रग्ज खरेदी करताना अटक

  • मालवणीमध्ये ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला रंगेहाथ अटक

  • मुंबई पोलिस दलात खळबळ

  • ५ ग्रॅम एमडी प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

संजय गडदे, मुंबई

मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का देणारी घटना मालाडच्या मालवणीतून समोर आली आहे. ड्रग्ज विक्रीच्या प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज पेडलरला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी सापळा रचला आणि त्यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल अडकला. ड्रग्ज घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडण्यात आले. ५ ग्रॅम एमडी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण इंदुलकर असं या पोलिसाचे नाव आहे. या पोलीस कॉन्स्टेबलला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. किरण इंदुलकर सध्या जोगेश्वरी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. यापूर्वी तो मालवणी पोलिस ठाण्यात कार्यरत होता. मालवणी पोलिसांना गेट क्रमांक ८ परिसरात ड्रग्जचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली.

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ
Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

पोलिसांनी ड्रग्ज पेडलरला अटक करण्यासाठी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून व्यवहार घडवून आणण्यात आला. यावेळी किरण इंदुलकरवर एमडी खरेदी केल्याचा आरोप आहे. व्यवहार पूर्ण होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. इंदुलकर याच्यावर यापूर्वीही तक्रारी झाल्याची माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी त्याची बदली करण्यात आली होती तसेच त्याला निलंबितही करण्यात आले होते. अटकेनंतर किरणला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने किरणला पोलिस कोठडी सुनावली असून मालवणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ
Palghar Crime: ६ जणांकडून तरुणीवर बलात्कार, मित्रासोबत पिकनिकला गेली असता भयंकर घडलं, पालघर हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com