

१५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस असतो. या दिवशी भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. शाळांमध्ये ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषणांचे आयोजन केले जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना सोपं आणि लक्षात राहील असं भाषण शिकवू शकता. त्यासाठी भाषणाची सुरुवात सोप्यापद्धतीने केली पाहिजे.
आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या जीवनात विशेष महत्त्वाचा आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा त्याग केला आहे. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले.
स्वातंत्र्य मिळणं ही सर्वात कठीण गोष्ट होती. बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर आणि असंख्य लोकांच्या बलिदानानंतर भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे स्वातंत्र्यदिन हा फक्त उत्सवाचा दिवस नाही, तर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देणारा दिवस आहे.
या दिवशी शाळा, सरकारी कार्यालये आणि संपूर्ण भारतात तिरंगा फडकवला जातो. राष्ट्रगीत गायले जाते आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. तिरंगा आपल्याला देशाची एकता, शौर्य आणि प्रगतीची आठवण करून देतो.
चला, या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करूया आणि भारताला जास्त मजबूत आणि सुंदर बनवण्याचा संकल्प करूया.
जय हिंद! जय भारत!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.