iPhone 16 
देश विदेश

iPhone 16 : सर्व आमदारांना आयफोन 16 प्रो मिळाले, पेपरलेस विधानसभेची सुरुवात

iPhone and iPad given to all MLAs : दिल्लीच्या सर्व ७० आमदारांना आयफोन १६ प्रो, आयपॅड आणि टॅबलेट देण्यात आले आहेत.विधानसभेचं कामकाज पेपरलेस आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

  • दिल्ली विधानसभेतील 70 आमदारांना आयफोन 16 प्रो, आयपॅड आणि टॅबलेट देण्यात आले.

  • आमदारांना डिजिटल तंत्रज्ञानासाठी विशेष प्रशिक्षण.

  • पर्यावरणपूरक आणि पारदर्शक कामकाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर.

  • केंद्र सरकारच्या "एक राष्ट्र, एक अॅप्लिकेशन" संकल्पनेचा भाग.

Delhi MLAs receive iPhone 16 Pro and iPads for paperless assembly work : दिल्ली विधानसभेतील सर्व ७० आमदारांना नुकतेच आयफोन 16 प्रो, आयपॅड आणि टॅबलेट देण्यात आले आहेत. पेपरलेस कामकाजाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय ई-विधान अॅप्लिकेशन (नेवा) च्या शुभारंभावेळी आमदारांना आयपॅड आणि टॅबलेट देण्यात आले. डिजिटल इंटरफेसची ओळख व्हावी म्हणून आमदारांना प्रशिक्षणही देण्यात आलेय.

सरकारच्या पेपरलेस कामकाजाच्या उपक्रमाला गती देण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विधानसभेचे कामकाज अधिक वेगावान होण्यासाठी दिल्लीच्या भाजप सरकारने हा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या "एक राष्ट्र, एक अॅप्लिकेशन" या संकल्पनेअंतर्गत राष्ट्रीय ई-विधान अॅप्लिकेशन (नेवा) उपक्रमाच्या उद्घाटनादरम्यान आमदारांना आयफोन, टॅबलेट देण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज विधानसभा

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह सर्व आमदारांना आयफोन 16 प्रो, आयपॅड आणि टॅबलेट देण्यात आले आहेत. यामुळे विधानसभेचे कामकाज डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. विधानसभा सचिवालयाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हे प्रीमियम उपकरण आमदारांनी वापरताना दिसले. यामुळे कागदपत्रांचा वापर कमी होऊन पर्यावरणपूरक कामकाजाला प्रोत्साहन मिळेल.

आमदारांना प्रशिक्षण

डिजिटल बदलाला सामोरे जाण्यासाठी दिल्लीमधील सर्व ७० आमदारांना मागील महिन्यात विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये स्मार्ट डेलिगेट युनिट, मायक्रोफोन, मतदान पॅनल, आरएफआयडी/एनएफसी तंत्रज्ञान, बहुभाषिक सुविधा, रिअल-टाइम कागदपत्र प्रवेश, एचडी कॅमेरे आणि सुरक्षित नेटवर्क यंत्रणेचा समावेश आहे. या प्रशिक्षणामुळे आमदारांना नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे सोपे झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT