आसाममधील दिब्रुगढमध्ये पत्नीने नवऱ्याचा खून करण्यासाठी मुलीच्या प्रियकराला सुपारी दिली.
१६ वर्षाच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने उत्तम गोगोई यांचा निर्घृण खून केला.
पोलिसांनी आठ दिवसात तपास करून पत्नी, मुलगी आणि दोघा आरोपींना अटक केली.
खून चोरीसारखा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण फॉरेन्सिक तपासणीने खरा तपशील उघड केला.
Assam wife gives supari to teen to kill husband : नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक अन् मन हेलावणारी घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून बायकोने नवऱ्याला तडफडून मारलं. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीने नवऱ्याला मारण्यासाठी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडलाच सुपारी दिली होती. पत्नीचा राक्षसी चेहरा समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आसाममधील दिब्रुगढमध्ये ही हादरवणारी घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव उत्तम गोगोई असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
५१ वर्षाच्या उत्तम गोगोई यांचा आठ दिवसापूर्वी घरात मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासातून पोलिसांना हा चोरीच्या संशयातून मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला होता. पण अधिक तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आले. उत्तम गोगोई यांच्या बायकोनेच मुलीच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला असल्याचे समोर आले. पोलिसांनी आठ दिवसात उत्तम गोगोई यांच्या हत्येचा शोध लावत मृतकाची पत्नी, मुलगी अन् अन्य दोन आरोपींना बेड्या ठोकल्या.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या मुलीने आणि तिच्या आईने दीपज्योती आणि त्याच्या एका अल्पवयीन मित्राला उत्तम गोगाई यांच्या हत्येची सुपारी दिली होती. यासाठी त्यांना मोठी रक्कम आणि सोन्याचे काही दागिने देण्यात आले होते. पोलिसांनी दीपज्योती बुरागोहैन आणि त्याच्या जोडीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या जबाबानंतर उत्तम गोगोईची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. दरम्यान, आरोपींनी गोगाई यांची हत्या ही चोरीसारखी दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या कहाण्यामध्ये खूपच फरक होता. फॉरेन्सिक तपासणीतही त्यांच्या सहभागाचे पुरावे मिळाल्याची माहिती तेथील वरिष्ठ पोलिस अधीक्षक राकेश रेड्डी यांनी दिली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिस आता या हत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. अटक करण्यत आलेल्या महिलेने प्रेम प्रकरणातून नवऱ्याचा खून केल्याचं तपासातून समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.