Trump Vs India : डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, भारताचे झुकेगा नहीं साला; रशियाकडून तेल खरेदी सुरूच, वाचा नेमकं कारण

russian oil impact on indian economy : डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताला तेल खरेदीबाबत धमकीवजा वक्तव्य, पण तरीही भारत रशियन तेल खरेदी करण्यावर ठाम आहे. यामागे नेमकं कारण काय आहे? आतंरराष्ट्रीय राजकारण की आर्थिक गणित.. जाणून घ्या..
russian-oil-impact-on-indian-economy-trump-warning
Donald Trump warns India of higher tariffs if Russian oil imports continue, but India remains firm due to economic dependence. Know the reasons and impact on refineries like MRPL, CPCL, and Reliance.Saam TV News Marathi
Published On
Summary
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा धमकी दिली आहे.

  • भारताने तेल खरेदी थांबवल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, म्हणून खरेदी सुरू ठेवली आहे.

  • रशियन तेलामुळे प्रति बॅरल GRM मध्ये 1-1.5 डॉलरचा फायदा भारताला होतो.

  • तेल खरेदी बंद केल्यास पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Trump warns India of tariff hike over oil purchase : रशियाकडून तेल खरेदी करू नये, म्हणून अमेरिकेकडून भारताला वारंवार धमकी मिळत आहे. रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही तर टॅरिफ दुप्पट केला जाईल, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं अद्याप थांबवलं नाही. रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवणं अथवा कमी करणं भारतासाठी सोप्प राहणार नाही. कारण, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं बंद केलं, तर मोठा फटका बसू शकतो. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही भारताकडून रशियाकडून तेल खरेदी अद्याप का थांबवले जात नाही, अथवा कमी केले जात नाही? त्यामुळे भारताला किती फटका बसू शकतो? याबाबत जाणून घेऊयात...

सोमवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून भारताला पुन्हा एकदा धमकी दिली. भारताकडून तेल खरेदी केले तर अतिरिक्त टॅरिफ लावला जाईल, अशा शब्दात त्यांनी भारताला धमकावले. अमेरिकेच्या विरोधानंतरही इंडिया रसियन ऑयलचे आयात थांबलेले नाही. यामागील प्रमुख कारण पैशांमध्ये लपले आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं कमी केले तर ग्रास रिफाइनरी मार्जिनमध्ये 1 ते 1.5 डॉलर प्रति बॅरलची घसरण होऊ शकते. रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवलं तर भारताला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

russian-oil-impact-on-indian-economy-trump-warning
हृदय पिळवटणारी घटना, मुलीच्या वाढदिवशीच वडिलांनी संपवले जीवन, धावत्या मालगाडीसमोर घेतली उडी

भारत आणि रशियाचे तेल आयात -निर्यात

रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या देशामध्ये भारताचाही समावेश आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये २०२२ मध्ये युद्ध सुरू झाले, तेव्हापासून रशियाच्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण आली. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करण्यास सुरूवात केली. २०१८-२२ या काळात रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांमध्ये भारताचा वाटा फक्त १.५ टक्के इतका होता. २०२३ मध्ये १९.३३ टक्के झाला अन् २०२५ मध्ये भारत जवळपास ३५ टक्के तेल खरेदी करत आहे.

जेएम फायनान्शियलच्या तज्ज्ञांच्या मते, रशियावर दबाव टाकण्यासाठी अमेरिकेने भारतावर तेल खरेदी न करण्याचा दबाव टाकला आहे. रशिया आर्थिक संकटात सापडलं तर युक्रेनसोबतचं युद्ध थांबलं जाईल. भारताने रशियन तेल आयात बंद केली तर क्रूडच्या किमती झपाट्याने वाढू शकतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन फेडरल रिझर्व्हवर व्याजदर कमी करण्याचा दबाव कमी होऊ शकतो. पण यावर सहजासहजी तोडगा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

russian-oil-impact-on-indian-economy-trump-warning
भाजपचा मविआला जोरदार धक्का, वसई-विरार अन् धाराशिवमध्ये राजकीय भूकंप, कोण कोणत्या नेत्यांनी साथ सोडली?

तेल कंपन्यांवर काय फरक पडणार ?

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली, तर याचा ऑयल मार्केटिंग कंपन्यांवर आणि CPCL/MRPL वर मोठा परिणाम होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजवरही किरकोळ नकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे जेएम फायनान्सने म्हटले आहे. रशियाच्या तेलावर प्रति बॅरल 3-4 डॉलर सूट मिळाल्यामुळे २०२३ पासून रिफायनर्सना प्रति बॅरल 1-1.5 डॉलरचा GRM फायदा झाला. यातून भारताच्या 30-40% क्रूड गरजा पूर्ण होतात. प्रति बॅरल 1 डॉलर GRM कमी झाल्यास आर्थिक वर्ष २०२६ मध्ये OMCs चा EBITDA 8-10%, MRPL/CPCL चा 20-25%, आणि रिलायन्सचा एकूण EBITDA सुमारे 2% प्रभावित होऊ शकतो.

russian-oil-impact-on-indian-economy-trump-warning
भाजपचा मविआला जोरदार धक्का, वसई-विरार अन् धाराशिवमध्ये राजकीय भूकंप, कोण कोणत्या नेत्यांनी साथ सोडली?

..तर कच्च्या तेलाच्या किंमती वाढणार -

भारताने जर रशियाकडून तेल खरेदी करणं बंद केलं आणि चीन किंवा इतर देशांनी याची भरपाई केली नाही. तर क्रूडच्या किमती झपाट्याने वाढू शकतात. चीन आधीच दररोज 2-2.5 दशलक्ष बॅरल रशियन तेल खरेदी करतो. तर त्याची एकूण मागणी 16.5 दशलक्ष बॅरल प्रतिदिन आहे. रशियाकडून भारताने तेल खरेदी बंद केली तर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

russian-oil-impact-on-indian-economy-trump-warning
Mumbai Local : ऑटोमॅटिक दरवाजा असणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार, पहिला व्हिडिओ समोर
Q

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला काय धमकी दिली आहे?

A

भारताने जर रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही, तर आयात शुल्क (टॅरिफ) दुप्पट केला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.

Q

अमेरिकेच्या धमकीनंतर भारत रशियन तेल का खरेदी करत आहे?

A

रशियन तेल स्वस्त आहे आणि त्यामुळे भारताच्या रिफायनरींना प्रति बॅरल 1-1.5 डॉलरचा GRM फायदा होतो. त्यामुळे देशाच्या तेल आयातीचा 30-40% भाग रशियातून येतो.

Q

रशियन तेल खरेदी थांबवल्यास भारताला कोणता फटका बसेल?

A

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, कंपन्यांचा EBITDA घटेल, आणि देशाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

Q

ट्रम्पच्या धमकीचा भारताच्या धोरणावर परिणाम होणार का?

A

सध्यातरी भारत रशियन तेल खरेदीवर ठाम असून त्यात बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com