हृदय पिळवटणारी घटना, मुलीच्या वाढदिवशीच वडिलांनी संपवले जीवन, धावत्या मालगाडीसमोर घेतली उडी

Ulhasnagar Station : उल्हासनगरमध्ये रेल्वे स्थानकावर मंजीत सिंग यांनी धावत्या मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही दु:खद घटना त्यांच्या मुलीच्या वाढदिवशीच घडली.
father-suicide-daughters-birthday-ulhasnagar
Ulhasnagar Station Where Manjit Singh Ended His Life on Daughter’s BirthdaySaam TV News Marathi
Published On
Summary
  • उल्हासनगरमध्ये मंजीत सिंग यांनी मालगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली.

  • मुलीच्या वाढदिवशी ही घटना घडली, त्यामुळे कुटुंबात शोककळा

  • मंजीत सिंग हे कंस्ट्रक्शन साईटवर सुपरवायझर म्हणून काम करत होते.

  • आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरू आहे.

उल्हासनगरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मुलीच्या वाढदिवशीच वडिलांनी धावत्या मालगाडीसमोर उडी घेत आयुष्याचा शेवट केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मंजीत सिंग असे आयुष्य संपवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबईच्या दिशेने मालगाडी जात असताना उल्हासनगर स्टेशनवर मंजीत सिंग यांनी मालगाडीच्या खाली उडी मारून आपलं जीवन संपवलेय.

उल्हासनगर रेल्वे स्थानकावर मंजीत सिंग (वय 65) या वृद्धाने धावत्या मालगाडीखाली उडी घेत आत्महत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही आत्महत्या त्यांच्या मुलीच्या वाढदिवशी घडल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मंजीत सिंग हे एका कंस्ट्रक्शन साइटवर सुपरवायझर म्हणून काम करत होते. अत्यंत शांत, कष्टाळू आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अजूनही समजलेलं नाही. कल्याण लोहमार्ग पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.

father-suicide-daughters-birthday-ulhasnagar
Vande Bharat Express: नागपूर-पुणे ‘वंदे भारत’ याच महिन्यात धावणार? मोठी माहिती समोर आली

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीखाली उडी घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. घरात वाढदिवसाच्या तयारीचा उत्साह असतानाच मृत्यूचं हे झणझणीत वास्तव समोर आलं आणि आनंद दुःखात बदलला. सिंग यांच्या या टोकाच्या निर्णयाने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, "बापच आपल्या लेकीच्या वाढदिवशी अशी अखेरची आठवण मागे ठेवून जाईल?" हा प्रश्न काळजात घर करून बसला आहे.

father-suicide-daughters-birthday-ulhasnagar
५ ऑगस्टचा मुहूर्त, केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? मोदी-शाह अॅक्शनमोडमध्ये, दिल्लीत घडामोडींना वेग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com