Vande Bharat Express: नागपूर-पुणे ‘वंदे भारत’ याच महिन्यात धावणार? मोठी माहिती समोर आली

Pune to Nagpur Vande Bharat Express route and stops : पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याच महिन्यात ही एक्सप्रेस धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Pune to Nagpur Vande Bharat Express route and stops
Vande Bharat Express Set to Connect Pune and Nagpur – Launch Expected This AugustSaam TV News Marathi
Published On
Summary
  • नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यातच धावण्याची शक्यता आहे.

  • प्रवासाचा वेळ दोन ते तीन तास वाचण्याची शक्यता आहे.

  • अजनीहून सुरुवात; दौंड, अकोला, भुसावळ अशा ९ थांबे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन होण्याची शक्यता

Pune Nagpur Vande Bharat Express Train : नागपूर आणि पुण्याला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे आणि नागपूर या दोन शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत होती. रेल्वेकडून आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते पुणे या दोन शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस याच महिन्यात धावणार आहे. रेल्वे बोर्डामधील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. (Pune to Nagpur Vande Bharat Express route and stops)

पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरहून पुण्याला येण्यासाठी मोजक्याच ट्रेन उपलब्ध आहेत. त्याशिवाय रस्ते मार्गे अनावशक वेळ जातो. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, या मागणीने जोर धारला होता. नागपूरमधील अजनी येथून वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर पुणे आणि नागपूर या दोन शहरांमधील अंतरही खूप कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ वंदे भारत एक्सप्रेसमुळे जवळ येणार आहे. नागपूर (अजनी)- पुणे या मार्गावर वंदे भारत धावणार असल्याचे रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डातील एका अधिकाऱ्याने दिली. (Vande Bharat Confirmed on Pune-Nagpur Route: All You Need to Know)

Pune to Nagpur Vande Bharat Express route and stops
Vande Bharat Food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवण मोफत मिळते का? वाचा रेल्वेचे नेमके नियम काय

पुणे-नागपूर किती वेळ वाचणार? - Travel time from Pune to Nagpur in Vande Bharat train

पुणे ते नागपूर यादरम्यान सध्या रेल्वने १२ ते १३ तासांचे अंतर लागते. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास नागपूर ते पुणे फक्त १० तासांत पोहचणं शक्य होणार आहे. दोन ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. पुणे आणि नागपूर या मार्गावर सध्या हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वांत जलद रेल्वे धावतेय. या ट्रेनला जवळपास १३ तास वेळ लागतो. वंदे भारतमुळे हा वेळ आणखी कमी होणार आहे. (PM Modi to inaugurate Pune Nagpur high-speed train)

Pune to Nagpur Vande Bharat Express route and stops
Mumbai to Pune : मुंबई-पुणे फक्त ९० मिनिटांत, तिसऱ्या एक्सप्रेस वेचा आराखडा तयार, पाहा नेमका मास्टरप्लॅन

कधी धावणार नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ?- (When will Vande Bharat start between Pune and Nagpur)

पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यात होणार आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी या मार्गावर वंदे भारत धावण्याची शक्यता हे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नागपूर (अजनी), बेळगाव-बंगळूर आणि कटरा-अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. ऑगस्ट महिनाच्या शेवटी अथवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्‍घाटन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळण्यासाठी रेल्वे बोर्डाने पीएम कार्यालयाशी संपर्क साधलाय. (Pune-Nagpur express inauguration date by PM Modi)

कोण कोणत्या स्थानकावर थांबणार ? Vande Bharat station list between Nagpur and Pune

दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा व वर्धा (Pune Nagpur Vande Bharat stoppage at Daund, Akola, Jalgaon)

Pune to Nagpur Vande Bharat Express route and stops
Mumbai Local : ऑटोमॅटिक दरवाजा असणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार, पहिला व्हिडिओ समोर
Q

पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे?

A

रिपोर्ट्सनुसार, नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ऑगस्ट महिन्यातच सुरू होण्याची शक्यता आहे.

Q

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे किती वेळ वाचवेल?

A

सुमारे २ ते अडीच तासांचा वेळ वाचणार आहे. सध्याचा १३ तासांचा प्रवास १० तासांमध्ये पूर्ण होईल.

Q

पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे कोणकोणत्या स्थानकांवर थांबे असतील?

A

दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा.

Q

नागपूर-पुणे वंदे भारत कोणत्या स्टेशनवरून सुरू होईल?

A

नागपूरजवळील अजनी स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सुरू होईल

Q

नागपूर-पुणे वंदे भारत या गाडीचे उद्घाटन कोण करणार आहे?

A

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

Q

पुणे ते नागपूर पर्यंतच्या वंदे भारतची संख्या किती आहे?

A

नागपूर-पुणे यादरम्यान दोन वंदे भारत धावण्याची शक्यता आहे. सकाळी वंदे भारत धावेल, तर सायंकाळी वंदे भारत स्लीपर धावण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या या मार्गावर एकही डायरेक्ट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाही.

Q

नागपूरहून किती वंदे भारत एक्सप्रेस धावतात?

A

नागपूरहून सध्या ४ वंदे भारत एक्सप्रेस धावतात.

  • नागपूर - बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस

  • नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस

  • नागपूर - इंदूर वंदे भारत एक्सप्रेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com