Vande Bharat Food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवण मोफत मिळते का? वाचा रेल्वेचे नेमके नियम काय

Does Vande Bharat Express provide food free? : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवण मोफत मिळत नाही. तिकिट बुकिंगवेळी पर्याय निवडावा लागतो. नंतरही खरेदी करता येते, पण त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते.
Vande Bharat Express
Vande Bharat Express UpdateSaam Tv
Published On
Summary
  • वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोफत जेवण दिलं जात नाही.

  • तिकिट बुकिंग करताना फूड ऑप्शन निवडावा लागतो.

  • बुकिंगवेळी न घेतलेलं जेवण आता ट्रेनमध्येही खरेदी करता येतं.

  • IRCTC ठराविक वेळातच जेवण विकतो – रात्री 9 नंतर विक्री थांबते.

  • अन्नाची गुणवत्ता राखण्यासाठी IRCTC ला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

Vande Bharat Express Free Food : वंदे भारत एक्सप्रेस ही भारताची पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन आहे. २०१९ मध्ये सुरू झालेली ही ट्रेन थोड्याच काळात अल्पवधीत लोकप्रिय झाली अन् देशातील नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. वंदे भारतमुळे आरामदायी प्रवास तर होतोच, त्याशिवाय नागरिकांचा वेळही वाचत आहे. १३० ते १८० किमी तासी वेगाने धावणारी ही ट्रेन आधुनिक सुविधांसह धावतेय. वाय-फाय, जीपीएस, ऑटोमॅटिक दरवाजे, आरामदायी सीट्स आणि मोठ्या खिडक्या आहेत. प्रवाशांना जलद आणि लक्झरी प्रवासाचा अनुभव देते. देशात ५० पेक्षा जास्त वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावते अन् १०० पेक्षा जास्त शहरांना जोडली जाते. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवण मोफत मिळते का? हा प्रश्न सर्वांच्या मनात येतोच. पण खरेच वंदे भारतमध्ये जेवणासाठी किती पैसे लागतात? अन् मोफत जेवण मिळते का? याबाबत जाणून घेऊयात... (is food free in vande bharat)

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोफत जेवण मिळते का? vande bharat train meal cost rules

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये रेल्वेकडून मोफत जेवण दिले जात नाही. तिकिटाचे बुकिंग करतानाच जेवणाचा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. (Vande Bharat Express: Do You Get Free Meals? Know the Facts) तिकिट बुकिंग करताना जेवणाचा पर्याय निवडला नसला अन् वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना जेवण घ्यायचं असेल तर काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण रेल्वेने फेब्रुवारीपासून वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना जेवण खरेदी करता येते. यामुळे शेकडो प्रवाशांना फायदा होत आहे. (Is Food Free in Vande Bharat Express? Here's What Railway Rules Say)

Vande Bharat Express
Vande Bharat Train: महाराष्ट्राला मिळणार ४ नव्या वंदे भारत ट्रेन, कोणत्या शहराला होणार सर्वाधिक फायदा? थांबा आणि प्रवासाचे तास किती?

वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणासंदर्भात पाच गोष्टी माहिती असाव्याच... Here are five things passengers should know :

जेवणाची निवड (Choice of meals) :

तिकिटाचे बुकिंग करताना जेवणाचे पर्याय निवडता येतो. पण तिकिटाच्या बुकिंगवेळी जेवणाचा पर्याय न निवडलेले प्रवासी वेगवेगळ्य जेवणाचे पर्याय घेऊ शकतात. यामध्ये उपलब्ध असल्यास शिजवलेले जेवण, तसेच पूर्वी उपलब्ध असलेल्या रेडी-टू-ईट (RTE) जेवणांचा समावेश आहे.

Vande Bharat Express
Vande Bharat : महाराष्ट्रात किती वंदे भारत धावतात? जाणून घ्या संपूर्ण यादी अन् थांबे

सुधारित सेवा (Improved services) :

प्रवाशांना अनेकदा ट्रेनमध्ये जेवण खरेदी करायचे असायचे, परंतु त्यांना ते उपलब्ध नाही असे सांगितले जायचे. रेल्वे बोर्डाच्या नवीन नियमांनुसार समस्यांचे निराकरण करणे आणि जे प्रवासी पैसे देण्यास तयार आहेत. त्यांना सर्वांना खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे. या बदलामागील एक प्रमुख कारण म्हणजे बुकिंगवेळी जेवणाचा पर्याय न निवडल्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ नाकारले जाण्याच्या तक्रारींचे निराकरण करणे.

Vande Bharat Express
Pune Train : पुणेकरांसाठी खुशखबर, रविवारपासून नवीन ट्रेन धावणार, नागपूरकरांना फायदा, वाचा कोण कोणते थांबे?

ठरलेल्या वेळेतच जेवण (Strict timings) -

गोंधळ टाळण्यासाठी IRCTC नियंत्रित वेळांमध्ये खाद्यपदार्थ विक्री करेल. ट्रॉलीद्वारे जेवण विकले जाते. पण रात्री 9 नंतर किंवा डिनर सर्व्हिसनंतर, यापैकी जे आधी असेल त्यानंतर खाद्यपदार्थ विकले जातात. यामुळे योग्य जेवणाचे वेळापत्रक राखले जाईल आणि प्रवाशांना रात्री उशिरा त्रास होणार नाही.

अन्नाची गुणवत्ता (Food quality) -

रेल्वे बोर्डाने सर्व प्रवाशांना उच्च-गुणवत्तेचे, स्वच्छतापूर्ण अन्न पुरवण्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे. IRCTC ला अन्न सुरक्षा मानके राखण्यासाठी आणि जेवण स्वच्छ पद्धतीने तयार व वितरित केले जाईल, याची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे बंधनकारक आहे.

Q

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवण मोफत मिळते का?

A

नाही. जेवणासाठी तिकिट बुकिंगवेळी पर्याय निवडावा लागतो आणि त्यासाठी अतिरिक्त शुल्क लागतो.

Q

वंदे भारतचे जर तिकिट बुकिंगवेळी जेवणाचा पर्याय निवडला नसेल तर काय?

A

फेब्रुवारीपासून IRCTC ने प्रवाशांना ट्रेनमध्येच जेवण खरेदी करण्याची सुविधा दिली आहे.

Q

वंदे भारतमध्ये जेवण कोणत्या वेळेत मिळते?

A

IRCTC ठराविक वेळेतच जेवण विकतो. रात्री 9 नंतर जेवण उपलब्ध नसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com