Vande Bharat Train: महाराष्ट्राला मिळणार ४ नव्या वंदे भारत ट्रेन, कोणत्या शहराला होणार सर्वाधिक फायदा? थांबा आणि प्रवासाचे तास किती?

4 Vande Bharat Train For Maharashtra: महाराष्ट्राला आणखी ४ वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. भारतीय रेल्वेने नुकताच याची घोषणा केली. या ट्रेन पुण्यातून धावणार आहेत. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास जलद आणि सुखकारक होणार आहे.
Vande Bharat: नव्या 4 वंदे भारत ट्रेनचा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला होणार सर्वाधिक फायदा? थांबा आणि प्रवासाचे तास किती?
Vande Bharat TrainSaam Tv
Published On

सुसाट आणि आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत ट्रेनला ओळखले जाते. या ट्रेनला प्रवाशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. कमी वेळात सुखकाक प्रवासामुळे प्रवाशांकडून या ट्रेनची मागणी देखील खूप वाढली आहे. भारतीय रेल्वेकडून महाराष्ट्राला आणखी ४ वंदे भारत ट्रेन भेट म्हणून मिळणार आहे. भारतीय रेल्वेने पुण्यातून आणखी ४ वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे पुणेकरांसाठी हे मोठं गिफ्ट मानले जात आहे. यामुळे पुण्यातील हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

भारतीय रेल्वेने पुणे शहराला ४ वंदे भारत ट्रेन गिफ्ट केल्या आहेत. या नवीन ट्रेनमुळे पुणे आता शेगाव, वडोदरा, सिंकदराबाद आणि बेळगाव या शहरांशी या जोडले जाणार आहे. यामुळे पुण्यावरून या शहरामध्ये जाणाऱ्या आणि त्या शहरातून पुन्हा पुण्यात येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी जलद आणि आरामदायी होणार आहे. या ट्रेन कोणत्या, त्यांचा थांबा कुठे असणार, प्रवासाला किती तास लागणार? हे आपण जाणून घेणार आहोत...

Vande Bharat: नव्या 4 वंदे भारत ट्रेनचा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला होणार सर्वाधिक फायदा? थांबा आणि प्रवासाचे तास किती?
Vande Bharat Train: गुड न्यूज! या मार्गावर धावणार १६ कोचची वंदे भारत ट्रेन, कसा असेल मार्ग?

पुणे–शेगांव वंदे भारत ट्रेन -

पुणे–शेगांव वंदे भारत या ट्रेनचा संभाव्य थांबा दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. या ट्रेनमुळे भाविक आणि पर्यटकांना शेगावला जलद आणि आरामदायी प्रवासाचा फायदा होईल. म्हणजे अगदी कमी तासांत त्यांना शेगावला जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेता येणार आहे. शेगावला जाणाऱ्या भाविकांसाठी हा ट्रेन प्रवासाचा खूपच चांगला पर्याय असणार आहे.

पुणे-वडोदरा वंदे भारत ट्रेन -

पुणे-वडोदरा वंदे भारत ट्रेनच्या संभाव्य थांब्यांमध्ये लोणावळा, पनवेल, वापी, सूरत रेल्वे स्थानकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. सध्या पुण्यावरून वडोदराला जाण्यासाठी ९ तासांचा प्रवास करावा लागतो. पण वंदे भारत ट्रेनमुळे ६ ते ७ तासांत हा पल्ला गाठता येणार आहे. या ट्रेनमुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान व्यवसाय जलद होईल. यासोबतच मुंबई-पुणे-गुजरात कॉरिडॉरची कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल.

Vande Bharat: नव्या 4 वंदे भारत ट्रेनचा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला होणार सर्वाधिक फायदा? थांबा आणि प्रवासाचे तास किती?
Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

पुणे-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन -

पुणे-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन ही दौंड, सोलापूर, गुलबर्गा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवासाचा वेळ सुमारे २ ते ३ तास कमी होईल. ही नवीन वंदे भारत ट्रेन व्यावसायिक, तांत्रिक आणि आयटी व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरेल. यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणामधील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल.

पुणे-बेळगाव वंदे भारत ट्रेन -

पुणे-बेळगाव वंदे भारत ट्रेन सातारा, सांगली, मिरज या रेल्वे स्थानकांवर थांबेल. ही ट्रेन पुण्याचे कर्नाटकच्या उत्तरेकडील औद्योगिक क्षेत्रांशी असलेले कनेक्शन सुधारेल आणि प्रादेशिक आर्थिक घडामोडींना चालना देईल.

Vande Bharat: नव्या 4 वंदे भारत ट्रेनचा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला होणार सर्वाधिक फायदा? थांबा आणि प्रवासाचे तास किती?
Vande Bharat Express Update : दोन आठवड्यात आणखी एक वंदे भारत धावणार, समोर आली मोठी अपडेट

पुणे-नागपूर स्लीपर वंदे भारत ट्रेन -

भारतीय रेल्वेचा पुणे आणि नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा विचार सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमधील व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटनासाठी रात्रीचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुधारू शकतो. पुण्यावरून नागपूरला कमी वेळात पोहचण्यास मदत होईल.

Vande Bharat: नव्या 4 वंदे भारत ट्रेनचा महाराष्ट्रातील कोणत्या शहराला होणार सर्वाधिक फायदा? थांबा आणि प्रवासाचे तास किती?
Vande Bharat: विमानासारखा लक्झरी प्रवास, ७ लांबपल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन; तास आणि तिकीट किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com