Shocking: गे डेटिंग ॲपवर ओळख, कारमध्ये नेत अश्लील व्हिडिओ शूट अन् खंडणीची मागणी; पुणे हादरलं

Pune Man Blackmailed After Grindr Meet-Up: पुण्यात ग्राइंडर अ‍ॅपवरून ओळख करून तरुणाला जाळ्यात ओढले. अश्लील व्हिडिओ शूट करून खंडणी मागितली. आरोपी अटकेत, दुसरा फरार, पोलिसांकडून चौकशी सुरू.
Pune Man Blackmailed via Gay Dating App
Pune Man Blackmailed via Gay Dating AppSaam Tv News
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील सिंहगडरोड परिसरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. गे डेटिंग अ‍ॅपवर ओळख करून तरूणांना जाळ्यात ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडिओ काढून आरोपी पीडित व्यक्तींना धमकी द्यायचे. नंतर कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देत लुटायचे. पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

पुण्यातील सिंहरोड परिसरातील गे डेटिंग अॅपचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गे डेटिंग अॅपवरून आरोपी आधी तरूणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. नंतर आरोपी पीडित व्यक्तींना भेटण्यासाठी बोलवायचे. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित व्यक्तीला बोलावून घेतलं.

Pune Man Blackmailed via Gay Dating App
Mumbai Crime: मुंबई हादरली! पाळणाघरात ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; ४४ वर्षांच्या नराधमाचा काळा कारनामा

नंतर कारमध्ये नेलं. आरोपीने पीडित व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ शूट केला. तसेच काही वेळानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. '१० हजार दे नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेन', अशी धमकी दिली. पीडितेनं रक्कम देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींनी तरूणाचा फोन हिसकावून घेतला. तसेच ऑनलाईन पद्धतीने रक्कम ट्रान्सफर करून घेतली.

Pune Man Blackmailed via Gay Dating App
Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात! मध्यरात्री कारची मोटारसायकलला धडक; ७ जणांचा मृत्यू, ३ कुटुंबावर दुखा:चा डोंगर

नांदेडसिटी पोलिसांनी तक्रारीवरून कारवाईला सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी रॉबीन उर्फ शुभम कांबळे याला अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. त्याचा साथीदार ओंकार मंडलिक फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com