Mumbai Crime: मुंबई हादरली! पाळणाघरात ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; ४४ वर्षांच्या नराधमाचा काळा कारनामा

7-Year-Old Girl Abused by Teacher: मालाड पूर्वेतील डे केअर सेंटरमध्ये शिक्षकाकडून ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत. इतरही मुलांवरील अत्याचाराचा पोलिसांकडून तपास सुरू.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv News
Published On

मुंबईतल्या मालाड पूर्व भागातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका खासगी डे केअर सेंटरमध्ये ७ वर्षीय चिमुरडीवर ४४ वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार केला आहे. याबाबतची माहिती पीडित चिमुकलीनं आई वडिलांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी चौकशी करत आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे मालाड पूर्व येथे डे केअर सेंटर आहे. आरोपी डे केअर आणि ट्युशन चालवायचा. त्याच्याकडे बरेच मुले येत होते. आरोपीच्या घराशेजारी एक ७ वर्षीय चिमुरडी राहत होती. ती आरोपीकडे ट्युशनसाठी यायची.घटनेच्या दिवशी आरोपी त्या पीडित चिमुरडीला बेडरूममध्ये घेऊन गेला.

Mumbai Crime News
प्रेमात गुलीगत धोका! साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी; स्टेट्स ठेवला अन् काळंनिळं होईपर्यंत मारलं | Tuljapur

यानंतर तिच्य हातात मोबाईल दिला. मोबाईलमध्ये गेम चालू करून दिला. तसेच तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी घरी गेली आणि आई वडिलांना सगळी हकीकत सांगितली. हे ऐकताच पीडितेच्या पालकांना संताप अनावर झाला. त्यांनी थेट दिंडोशी पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

इतर पालकांनी देखील पुढाकार घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या आरोपी दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याने आणखी किती चिमुकल्यांसोबत असे कृत्य केलं आहे, याबाबतचा तपास सुरू आहे.

Mumbai Crime News
Politics: कोल्हापुरात राजकीय भूकंप! काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com