Metro  Saam tv
देश विदेश

Metro : आता मेट्रोत रिल्स, व्हिडिओ कराल तर कारवाई होणार, सरकारचा मोठा निर्णय

Delhi Metro Ban Shooting Reels: दिल्ली मेट्रोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मेट्रोल रिल्स, व्हिडिओ काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा,यासाठी दिल्ली मेट्रोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Siddhi Hande

दिल्ली मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय

मेट्रोत आता रिल्स, व्हिडिओ बनवण्यास बंदी

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने निर्णय

मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकजण मेट्रोत रिल्स बनवतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी हे व्हिडिओ पोस्ट करतात. दरम्यान, आता मेट्रोने महत्त्वाचा निर्णय आहे. आता मेट्रोत रिल्स बनवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोने यासंबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली मेट्रोत आता कोणत्याही प्रकारचे रिल्स, व्हिडिओ शूट करण्यास मनाई करण्यात आली आहे. जर तुम्ही व्हिडिओ शूट केले तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हा नियम १४ सप्टेंबरपासून लागू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या शेवटपर्यंत हा नियम प्रत्यक्षात मेट्रोत लागू करण्यात येणार आहे.

दिल्ली मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय

DMRCच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रधान कार्यकारी संचालक अनुल दयाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. व्हिडिओ शूट करण्याऱ्यांमुळे प्रवाशांनी गैरसोय होऊ नये, यासाठी खात्री घेतली जाईल.

याशिवाय दिल्ली मेट्रोने एक सोशल मिडिया मोहिम सुरु केली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना सांगितले जाणार आहे की, मेट्रोमध्ये मोठ्या आवाजात कोणतीही गाणी ऐकू नये. जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रोत रिल्स बनवण्याच्या ट्रेंड सुरु आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवणे हे चांगले नाही. यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ शकतो. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या आवाजामुळे त्रास होईल. त्यामुळेच दिल्ली मेट्रोने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासींच्या जमिनी गैर-आदिवासींना भाडे तत्त्वावर देण्याचा डाव - माजी मंत्री वसंतराव पुरके

Rupali Bhosle: निळी साडी अन् केसात गुलाबाचं फूल, रूपालीचं सौंदर्य नजर हटणार नाही

Face Care Tips: ग्लोइंग अन् हेल्दी स्कीनसाठी आजच बदला 'या' सवयी, अन्यथा त्वचा होईल खराब

Marathi Actress: 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, ते पण नवरात्रीत'; 'बोल्ड' फोटोशूटमुळं मराठी अभिनेत्री ट्रोल

Ramlila: राजा दहशथची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने सिंहासनावरच सोडले प्राण; मन सुन्न करणारा VIDEO

SCROLL FOR NEXT