Tesla Showroom Delhi: टेस्ला कंपनीचा मोठा निर्णय! दिल्लीतील नवीन शोरूम लवकरच प्रेक्षकांसाठी खुले होणार

Dhanshri Shintre

पहिला इलेक्ट्रिक कार शोरूम

टेस्लाने १५ जुलैला मुंबई वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आपला पहिला इलेक्ट्रिक कार शोरूम सुरू केला.

दुसरे टेस्ला शोरूम

कंपनी लवकरच दिल्लीमध्ये दुसरे टेस्ला अनुभव केंद्र सुरू करणार असून, ते भारतातील दुसरे शोरूम ठरेल.

सोशल मीडिया

टेस्ला इंडियाच्या अधिकृत 'ट्विटर' हँडलवर आज दिल्लीतील नवीन शोरूमचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कधी ओपन होणार?

टेस्ला इंडियाच्या पोस्टमध्ये "दिल्लीत येत आहे... संपर्कात रहा" आणि ११ ऑगस्ट २०२५ ही तारीख दिली आहे.

सोशल मीडिया

दिल्लीतील वर्ल्डमार्क ३, एरोसिटी येथे उघडणाऱ्या टेस्ला शोरूमचे फोटो सोशल मीडियावर अलीकडेच व्हायरल झाले आहेत.

दिल्लीमध्ये टेस्ला शोरूम

टेस्ला इंडिया ने गुरुग्राम सोहना रोडवरील ऑर्किड बिझनेस पार्कमधील ३३,४७५ चौ.फु. मालमत्ता भाड्याने घेतली आहे.

आउटलेटसह सुविधा

दिल्ली-एनसीआरमध्ये टेस्लासाठी ग्राहक सेवा, वितरण व रिटेल आउटलेटसह सुविधा केंद्र उभारले जाणार आहेत.

पहिली इलेक्ट्रिक कार

मुंबईतील पहिल्या शोरूमसह टेस्लाने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार, टेस्ला मॉडेल वाय लाँच केली आहे.

किंमत

टेस्ला मॉडेल वायची मुंबईतील एक्स-शोरूम किंमत सुरुवातीस ५९.८९ लाख रुपये आहे.

NEXT: टेस्ला नावाचा अर्थ काय? हे नाव एलोन मस्कसाठी इतके खास का आहे?

येथे क्लिक करा