Delhi Accident: भीषण अपघात; फोनवर प्रेयसीसोबत गप्पा; बोलण्याच्या नादात कारनं ६ जणांना उडवलं

Delhi Dwarka Accident : दिल्लीतील द्वारका येथे एक भीषण अपघात घडला असून एका कार चालकाने बस स्टँडजवळ उभ्या असलेल्या सहा जणांना उडवलंय. यातील दोनजण गंभीर आहेत.
Jamner Accident
Delhi Dwarka Accident Saam tv
Published On
Summary
  • दिल्ली परिवहन महामंडळाच्या हा कर्मचाऱ्यांना जणांना मारहाण झाली.

  • हा भीषण अपघात घटना द्वारका सेक्टर २१ मधील अंडरपासजवळ घडला.

  • दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीतील द्वारका येथे एक भीषण अपघात घडला. एका कार चालकाने बस स्टँडजवळ उभ्या असलेल्या दिल्ली परिवहन महामंडळाच्या (डीटीसी) ६ कर्मचाऱ्यांना चिरडलं. या अपघातात सर्व सहा जण जखमी झाले आहेत, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. धडकेनंतर कार बस स्टँडवर आदळली, त्यामुळे बस स्टँडचे नुकसान झाले. या अपघातात सर्व सहा जण जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jamner Accident
Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

हा भीषण अपघात घटना द्वारका सेक्टर २१ मधील अंडरपासजवळ घडला. मिळालेल्या माहितीनुसार, चालक त्याच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होता. बोलण्याच्या नादातच त्याने डीटीसीच्या कर्मचाऱ्यांना उडवलं. अपघाताची माहिती मिळताच द्वारका सेक्टर-२३ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

Jamner Accident
Solapur Police Traffic Update: ऐकलं का बे, नवरात्रनिमित्त सोलापूर शहरातील वाहतुकीत बदल झालाय ना! जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?

रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर चार जणांना घरी पाठवले, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आलंय. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, डीटीसी तिकीट तपासणी करणारे सहा कर्मचारी ड्युटीवर होते. शुक्रवारी प्रवाशांची तिकिटे तपासण्यासाठी हे सर्व कर्मचारी विविध बस स्टॉपवर तैनात होते. त्यावेळी भरधाव कारने त्यांना धडक दिली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की चालक त्याच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होता. या संभाषणामुळे चालक उत्साहित झाला, ज्यामुळे कारचे नियंत्रण सुटलं आणि ६ जणांना उडवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com