
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी ब्रिटनला जात होते.
ट्रम्प यांच्या विमानात आणि स्पिरिट विमानामध्ये फक्त १२ किलोमीटरचे अंतर होतं.
ट्रम्प हे २८००० आणि २९००० अशी दोन बोईंग ७४७ विमाने प्रवासासाठी वापरतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. दोन विमानांची हवेतच धडक होणार होती. सुदैवाने ही बाब लक्षात येताच तात्काळ अलार्म वाजवण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कवरून उड्डाण करत असताना, एक प्रवासी विमान त्यांच्या विमानाच्या मार्गावरून गेले. दोन्ही विमानांमध्ये हवेत धडक होण्याची शक्यता होती.
दोन्ही विमानाची धडक होणार असल्याचं लक्षात येताच अलार्म वाजवण्यात आला. त्यांतर उड्डाण नियंत्रकांनी (कंट्रोलर) ताबडतोब प्रवासी विमानाच्या पायलटला मार्ग मोकळा करायला सांगितलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया त्यांच्या स्पेशल विमानाने ब्रिटनला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी स्पिरिट एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान त्यांच्या विमाना जवळ आले. धडक होण्याची शक्यता होती.
तेव्हा कंट्रोलरने ताबडतोब स्पिरिट एअरलाइन्सच्या पायलटला विमान वळवून लाईन सोडण्यास सांगितलं. फ्लाइट रडारनुसार ट्रम्प यांच्या विमानात आणि स्पिरिट विमानामध्ये फक्त १२ किलोमीटरचे अंतर होतं. ही बाब लक्षात येताच हवाई नियंत्रण पथक सक्रिय होत ताबडतोब स्पिरिट विमानाच्या पायलटला सूचना पाठवण्यास सुरुवात केली.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे ७४७ विमान त्यांच्या रेषेत मागे आहे. त्यामुळे नियंत्रकांनी प्रवासी विमानाला २० अंश उजवीकडे जाण्यास सांगण्यात आलं. जेणेकरून मागून येणाऱ्या विमानाच्या उड्डाणात अडचण येऊ नये. स्पिरिटच्या प्रवक्त्याने सांगितले की, पायलटने सर्व सूचनांचे पालन केले. विमान सर्व प्रवाशांसह सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे २८००० आणि २९००० अशी दोन बोईंग ७४७ विमाने प्रवासासाठी वापरतात. या विमानांसाठी हवाई दलाचे पदनाम VC-25A आहे. ट्रम्पसाठी राखीव असलेल्या विमानाला एअर फोर्स वन असे नाव देण्यात आलंय. जे एक तांत्रिक पदनाम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.