Solapur Police Traffic Update: ऐकलं का बे, नवरात्रनिमित्त सोलापूर शहरातील वाहतुकीत बदल झालाय ना! जाणून घ्या बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग कोणते?

Solapur Traffic Diversion : नवरात्रोत्सवातील मिरवणुकीदरम्यान सोलापूर शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलाय. २२ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी मिरवणुकीदरम्यान वाहतुकीत बदल होणार आहेत.
Solapur Police Traffic Update
Traffic changes announced in Solapur for Navratri processions – Check closed roads and alternate routes.saam tv
Published On
Summary
  • सोलापूरात २२ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबरला मिरवणुका निघणार आहेत.

  • पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी वाहतुकीत बदल केलेत.

  • बाळवेस चौक, टिळक चौक, कोतम चौक, माणिक चौक परिसरातील रस्ते बंद.

गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. राज्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोलापूरात नवरात्रीनिमित्त काही मंडळाकडून मिरवणूक देखील काढली जाते. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केलाय. नवरात्र उत्सवाला सोमवार २२ सप्टेंबर पासून प्रारंभ होणार आहे. यादिवशी घटस्थापना केली जाणार आहे. दरम्यान सोलापूर शहरात नवरात्र उत्सवात काही मंडळाकडून मिरवणूक देखील काढली जाते.

या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी वाहतुकीच्या मार्गात बदल केलाय. नवरात्र उत्सवानिमित्त २२ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी शहरातून शक्ती देवीची मिरवणूक काढली जातेय. काही मंडळाची मिरवणूक राष्ट्रीय महामार्गावरून निघते. तसेच बाळवेस चौक, टिळक चौक, मधला मारुतीचौक, कोतम चौक, माणिक चौक आणि मंगळवार पेठ पोलीस चौकी या परिसरात साहित्य खरेदी करण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

Solapur Police Traffic Update
Solapur : तडिपारीच्या नोटिसीला आव्हान; गुन्हेगाराला हायकोर्टाने सुनावला एक लाख रुपयांचा दंड

त्यामुळे अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतुक कोंडीची शक्यता आहे. २२ सप्टेंबर सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक २ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आलीय.

Solapur Police Traffic Update
GST Reform: नवरात्रोत्सवाचा आनंद वाढणार; दूध, तेल, साबण ते टीव्ही, फ्रीज झालं स्वस्त

कोणत्या मार्ग असतील बंद

बाळवेस चौक, टिळक चौक, मधला मारुतीचौक, कोतम चौक, माणिक चौक व मंगळवार पेठ पोलीस चौकी परिसरात पूजेसाठी तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होते. २२ सप्टेंबर सकाळी ६ वाजल्यापासून ते २ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. पोलीस खात्याची वाहने अत्यावश्यक सेवेची आणि पोलिसांच्या वाहनास परवानगी असेन.

बाळीवेस ,बीएसएनएल ऑफिस, मंगळवार पेठ पोलीस चौकी ते कुंभार बेस्ट मार्गे कोणतं चौक आणि पुढे समाचार चौक मार्गे माणिक चौक हा पर्यायी मार्ग असेल या आदेशाचा भंग केल्यास त्या व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com