GST Reform: नवरात्रोत्सवाचा आनंद वाढणार; दूध, तेल, साबण ते टीव्ही, फ्रीज झालं स्वस्त

GST Reform Milk to Refrigerators : नवीन जीएसटी दरामुळे नवरात्रोत्सवापूर्वी ग्राहकांना दिलासा मिळालाय. जीएसटी काउंसिलने दूध, तेल, साबण, बटर, चीज, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वाहनांसह ३७५ वस्तूंवर दर कपातीची घोषणा केलीय.
GST Reform Milk to Refrigerators
From milk and soap to TVs and refrigerators – over 375 items get cheaper after GST rate cut from September 22.saam tv
Published On
Summary
  • जीएसटी परिषदेनं ३७५ वस्तूंवर दर कपात केली.

  • २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होतील.

  • दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहनांपर्यंत सगळं स्वस्त होणार.

जीएसटी करण्यात आलेल्या कपातीनंतर स्वयंपाकघरातील वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, उपकरणे आणि वाहनांपर्यंत सुमारे ३७५ वस्तू स्वस्त होणार आहे. उद्या म्हणजेच २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं जीएसटी काउंसिलमध्ये जीएसटीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.

जीएसटीमध्ये सुधारणा केल्यानतंर तूप, चीज, बटर, नमकीन, केचप, जाम, ड्रायफ्रुट्स, कॉफी आणि आईस्क्रीम यासारख्या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि टीव्ही, एअर कंडिशनर (एसी), वॉशिंग मशीन यासारख्या महागड्या वस्तू देखील स्वस्त होतील. जीएसटीमधील बदल लक्षात घेता, फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपन्यांनी आधीच किमतीत कपात जाहीर केलीय.

औषधे स्वस्त झाली

बहुतेक औषधे, फॉर्म्युलेशन, ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट्स सारख्या वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी दर ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेत. यामुळे सामान्य माणसासाठी औषधे स्वस्त झाली आहेत. सिमेंटवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आलाय, यामुळे घर बांधणाऱ्यांनाही फायदा होणार आहे.

GST Reform Milk to Refrigerators
Ladki Bahin Yojana: E-KYC कशी करायची? खुद्द आदिती तटकरेंनीच लाडक्या बहिणींना दिली स्टेप बाय स्टेप माहिती

वैद्यकीय दुकानांना विशेष सूचना

जीएसटी कपातीचे फायदे लक्षात घेऊन सरकारने फार्मसींना त्यांच्या कमाल किरकोळ किमती (एमआरपी) सुधारित करण्याचे किंवा कमी किमतीत औषधे विकण्याचे निर्देश आधीच दिले आहेत. जीएसटी दर कपातीचा सर्वाधिक फायदा वाहन खरेदीदारांना होणार आहे, कारण लहान आणि मोठ्या कारवरील कर दर अनुक्रमे १८ टक्के आणि २८ टक्के करण्यात आलेत. अनेक कार कंपन्यांनी आधीच किमती कमी करण्याची घोषणा केलीय

GST Reform Milk to Refrigerators
WhatsApp Business Summit: झटपट होईल डील; व्‍हॉट्सअ‍ॅप छोट्या व्यवसायिकांचा वाढवणार बिझनेस

केसांचे तेल, साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू देखील स्वस्त होऊ शकतात. त्यावरील कर १२/१८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आलाय. टॅल्कम पावडर, फेस पावडर, शेव्हिंग क्रीम, आफ्टरशेव्ह लोशन इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीही कमी होऊ शकतात, कारण यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आले आहे.

२२ सप्टेंबरपासून जीएसटीचे दोन स्लॅब असतील. बहुतेक वस्तू आणि सेवांवर ५ ते १८ टक्के कर आकारला जाईल. लक्झरी वस्तूंवर ४० टक्के कर आकारला जाईल. तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवर २८ टक्के कर आणि त्यासोबत उपकर आकारला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com