
मुंबईत व्हॉट्सअॅप बिझनेस समिट 2025 पार पडलं.
छोट्या उद्योजकांना आणि व्यवसायिकांना मदत करणारी नवी फीचर्स सादर झाली.
ग्राहकांपर्यंत पोहोच आणि झटपट डील्ससाठी टूल्स देण्यात आले.
सर्व प्रकारच्या व्यावसायिकांचा बिझनेस वाढणार आहे, जगातल्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांपर्यंत व्यावसायिक पोहोचू शकणार आहेत. व्यवसायिकांनी यशच्या शिखरावर पोहचवण्यासाठी व्हॉट्सअॅप त्यांची मदत करणार आहे. मुंबईत व्हॉट्सअॅपचं दुसरं वार्षिक बिझनेस समिट पार पडलं. यात अनेक टूल्स आणि सुधारित फीचर्सची ओळख करून देण्यात आली. हे सर्व फीचर्स व्हॉट्सअॅप बिझनेसचा फायदा घेत असलेल्या सर्व व्यवसायिकांची कार्यक्षमतेला गती देण्यास डिझाइन करण्यात आले आहे.
आताची क्षमता अधिक दृढ करत व्हॉट्सअॅपने आता लहान व्यवसायांसाठी नवीन फीचर्स दाखवलेत. यात त्यांना व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपमध्ये प्रत्यक्ष सुरक्षित व सोईस्कर पेमेंट पर्याय देण्यात आलाय. अॅपवर हा पर्याय उपलब्ध असल्याने लहान व्यवसायिक आता जलद कार्यक्षमपद्धतीने त्यांच्या उत्पादनांची विक्री एका टॅपमध्ये करू शकतील. व्यवहारासाठी ते त्वरित क्यूआर कोड शेअर करू शकतात, ज्यामुळे ग्राहक व्हॉट्सअॅपवर त्यांच्या निवडीने पेमेंट पद्धतीचा वापर करत प्रत्यक्ष पेमेंट करू शकतात.
युझर एका टॅपमध्ये मोठ्या व्यवसायांशी संपर्क साधू शकतात. तसेच त्यांनी विनंती केलेल्या व्यवसायांचे कॉल्स स्वीकारू शकतात. ही कॉलिंगच्या फीचरमुळे व्यक्ती चौकशी केली जाते शिवाय ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे याची माहिती मिळते. हे फीचर भारतातील सर्व व्यवसायांसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप वॉईस मेसेजेस् पाठवण्याची व स्वीकारण्याची किंवा व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा सुरू करणार आहे. याचा फायदा टेलिहेल्थ अपॉइण्टमेंट सारख्या गोष्टींसाठी होऊ शकतो.
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस एआयची अंमलबजावणी केली जाणार आहे. यात ग्राहक वॉईस कॉलिंग फीचरचा वापर करत एआय असिस्टण्टशी बोलून शंकांचे निराकरण करू शकतात. भारतातील व्यवसाय आता व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे विपणन धोरण तयार करू शकतात. तसेच व्यवस्थापन करू शकतात, जे सर्व अॅड्स मॅनेजरमध्ये आहे. यामुळे व्यवसायांना एका केंद्रीकृत ठिकाणी समान क्रिएटिव्ह, सेटअप फ्लो व बजेट वापरता येतील. ऑनबोर्ड झाल्यानंतर व्यवसाय त्यांची सबस्क्रायबर यादी अपलोड करू शकतात.
अतिरिक्त प्लेसमेंट म्हणून मॅन्युअली मार्केटिंग मेसेज निवडू शकतात. दरम्यान मारूती सुझुकी, एअर इंडिया व फ्लिपकार्ट यांसारखे ब्रँड्स अॅड्स इन स्टेटस फीचर्सचा वापर करत आहेत. जिओ हॉटस्टार सारख्या लोकप्रिय चॅनेल्सनी देखील प्रमोटेड चॅनेल्सचा वापर करायला सुरूवात केलीय. मारूती सुझुकी ब्रँड व त्यांच्या उत्पादनांच्या शोधाला चालना देण्यासाठी अॅड्स इन स्टेटसचा वापर करत आहे.
एमएसआयएलच्या मार्केटिंगचे कार्यकारी संचालक भुवन धीर म्हणाले, ''आम्ही व्यवसाय विकासाला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपचा वापर करत आहोत. अॅड्स ऑन व्हॉट्सअॅप स्टेटस आम्हाला आमची उत्पादने व सेवांचा शोध आणि विक्रीला चालना देण्यास अधिक मदत करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.