Maharashtra Government: घरबसल्या पूर्ण होतील शासकीय कामे, व्हाट्सअ‍ॅपवर मिळतील कागदपत्रे

WhatsApp Services For Government Work : महाराष्ट्र सरकार व्हॉट्सअॅपवर अधिकृत कागदपत्रे उपलब्ध करून देणार आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत नागरिक आता घरबसल्या प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांसाठी अर्ज करू शकतात.
WhatsApp Services For  Government Work
Maharashtra Govt brings government services to WhatsApp – Apply and get documents from home.saamtv
Published On
Summary
  • महाराष्ट्र शासनानं शासकीय सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून दिल्या.

  • घरबसल्या जन्म, जात, उत्पन्न प्रमाणपत्रांसाठी अर्ज व कागदपत्रे मिळणार.

  • नागरिकांना वेळ, पैसा आणि कार्यालयीन फेर्‍यांपासून सुटका होणार.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

'सरकारी काम आणि दोन महिने थांब', अशी म्हण गावात अनेकांच्या तोंडी ऐकली असेल. आता सरकारी कामकाजातील किचकट प्रक्रिया आणि कार्यालयाच्या फेऱ्या मारणं कमी होणार आहे. कारण सरकार शासकीय कामांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. 'आपले सरकार' पोर्टलवरील सर्व सेवा आता थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे आवश्यक सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी घरबसल्या अर्ज करणे आणि ती मिळवणे सोपे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावा. यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे असून त्यानुसार सर्व सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेत, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

WhatsApp Services For  Government Work
भाजपचा दोन ठिकाणी राजकीय स्ट्राईक! शरद पवार गटाला धक्का, बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे राज्यातील १००१ सेवा नागरिकांना पुरवल्या जात आहेत. त्यातील ९९७ सेवा प्रत्यक्ष पोर्टलवर सुरू आहेत. गेल्या पंधरा दिवसांत २३६ नवीन सेवांची यात भर पडली आहे. आता या सर्व सेवांचा लाभ व्हॉट्सअॅपवरही घेता येईल. त्यामुळे नागरिकांना वेळ वाचवून त्वरित सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

WhatsApp Services For  Government Work
Teacher ID Scam: बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, ६८० शिक्षकांना अटक होणार?

सेवा वेळेवर आणि व्यवस्थित पोहोचाव्यात यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात ‘रिंग आणि क्लस्टर प्रणाली’ राबवण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. आधी एका तालुक्यातील १० ते १२ गावांचा समावेश करून नागरिकांना आवश्यक सेवा पुरवल्या जाणार आहेत. या सेवांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र गट तयार होणार असून सेवा सुलभ करण्यासाठी ‘डिश डिजिटल सेवा हब’ चा वापर केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

सरकारने घेतले ९ मोठे निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आजच्या बैठकीमध्ये जलसंपदा, कामगार, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यासाठी मोठे निर्णय घेण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com