मोठी बातमी ! हावड़ा-नई दिल्ली मार्गावर सुपरफास्ट ट्रेनमध्ये लागली आग; धावत्या रेल्वेतून प्रवाशांच्या उड्या

Fire Erupts In Superfast Train: झारखंडमधील जामतारा जिल्ह्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना टळलीय. हावडा-नवी दिल्ली मार्गावर टाटा १८१८४ सुपरफास्ट ट्रेनच्या एका डब्याला अचानक आग लागली.
Fire Erupts In Superfast Train
Passengers jump off moving Howrah-New Delhi superfast train after fire breaks out in coach near Jamtarasaam tv
Published On

हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावर टाटा १८१८४ सुपरफास्ट ट्रेनच्या एका बोगीला अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती होताच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. ही घटना जामतारा जिल्ह्यातील कालाझारिया रेल्वे ट्रॅकजवळ ही घटना घडलीय. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, डब्यातून अचानक धूर आणि ज्वाला येऊ लागल्यानंतर प्रवाशांमध्ये भीती पसरली. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारण्यास सुरुवात केली.

दरम्यान प्रसंगावधान राखत लोको पायलटने ताबडतोब ट्रेन थांबवली आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. ट्रेन सुमारे ४५ मिनिटे थांबली, त्या दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राने आग शमवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com