Arvind Kejriwal On Delhi Election Result Saam Tv
देश विदेश

Delhi Election 2025 Result : दिल्लीत 'आप'ला दणका! विधानसभेच्या निकालावर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Arvind Kejriwal : नवी दिल्ली मतदारसंघात आपचे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. एकूणच दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचा पाडाव झाला आहे. दरम्यान या पराभवावर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे. नवी दिल्ली मतदारसंघात आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा १२,००० मतांनी पराभव झाला आहे. भाजपच्या परवेश सिंह यांनी केजरीवाल यांच्यावर मात केली आहे. दिल्लीत आपचे इतर मोठे नेतेही पराभूत झाले आहेत. या पराभवावर अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये केजरीवाल म्हणाले, 'आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जनतेचा जो निर्णय आहे तो आम्ही पूर्ण विनम्रतेने स्विकारत आहोत. मी भारतीय जनता पार्टीचे विजयाबद्दल अभिनंदन करु इच्छितो. दिल्लीच्या जनतेने ज्या आशा आणि अपेक्षा ठेवून त्यांना बहुमत दिले आहे, त्या ते पूर्ण करतील अशी मला आशा आहे.'

'मागील दहा वर्षात जनतेने आम्हाला संधी दिली. त्या कार्यकाळात आम्ही अनेक विकास कामे केली. खास करुन शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम केले. लोकांना दिलासा देण्याचा आम्ही अनेक मार्गांनी प्रयत्न केला. दिल्लीतील पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न केला', असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले.

'आता जनतेने जो कौल दिला आहे, त्यानुसार आम्ही सकारात्मकपणे विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करु. याशिवाय आम्ही समाज सेवा, दिल्लीच्या जनतेच्या सुख-दु:खात मदत करत राहू. शक्य तितके वैयक्तिक सहकार्य करु. सत्ता मिळवण्यासाठी आम्ही राजकारणात प्रवेश केला नाही. लोकांची सेवा करण्याचे राजकारण हे एक माध्यम आहे' असे केजरीवाल म्हणाले.

व्हिडीओच्या शेवटी अरविंद केजरीवाल यांनी 'मी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी हुशारीने निवडणूक लढवली. खूप मेहनत केली. या निवडणुकीत तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला' असे म्हणत पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT