Shraddha Walker case saam tv
देश विदेश

श्रद्धा हत्या प्रकरण : आफताब पुनावालाचं कुटुंब गायब; पोलिसांनाी व्यक्त केला 'हा' संशय

पोलिसांनी आफताबच्या कुटुंबाला आफताबच्या कृत्याची माहिती होती, असा संशय वसई पोलिसांनी व्यक्त केला आहे

चेतन इंगळे

Shraddha Walker case : पालघरच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपासात नवनवीन खुलासे समोर येत आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनेतील आरोपी आफताब पूनावालाचे क्रौर्य हळूहळू समोर येत आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब अमीन पूनावालाचे कुटुंब गायब झाल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी आफताबच्या कुटुंबाला त्याच्या कृत्याची माहिती होती, असा संशय वसई पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पुनावालाचं कुटुंब सध्या गायब आहे. हत्या केल्यानंतर आफताब हा श्रद्धाचे एटीएम व डेबिट कार्ड वापरत होता. श्रद्धाच्या हत्येनंतर सध्या आफताबचे कुटुंब वसई माणिकपूर पोलिसांच्या देखील संपर्कात नाही. जेव्हा आफताबला पोलिासांनी जवाब नोंद करण्यासाठी बोलाविले होते. तेव्हापासून आफताबचं कुटुंब गायब झालं आहे. त्याचं कुटुंब अज्ञात ठिकाणी स्थलांतरीत झालं आहे.

आफताबच्या कुटुंबानं पोलिसांना (Police) न कळवता त्यांनी दुसऱ्यांना घर भाडे तत्वावर दिलं आहे. पोलिसांना संशय आहे की, आफताबच्या कुटुंबाला त्याच्या कृत्याची माहिती होती, त्यामुळे त्यांनी घाईघाईत घर बदली केले आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब तिचे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड वापरत होता, अशी माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली आहे.

दिल्ली पोलीस करणार आफताबची नार्को टेस्ट

श्रद्धा हत्या प्रकरणात पोलिसांना मृतदेहाचे तुकडे मिळाल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा आरोपी आफताबला घेऊन रात्री त्याच्या घरी तपासासाठी गेले. यावेळी पोलिसांना त्याच्या घरी रक्ताचे डाग मिळाले आहेत.

श्रद्धा हत्येप्रकरणी आता दिल्ली (Delhi) पोलीस आफताबची नार्को टेस्ट करणार आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने सदर परवानगी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात; ४८०कोटी रुपये वाटपास मंजुरी, कोणत्या जिल्ह्यांना मिळेल मदत

Thurday Horoscope : हितशत्रूंचा त्रास संभवतोय, अडचणी मागे लागतील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात साडेसातीचे संकेत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून ४० किमी अंतरावर आहे सुंदर मंदिर; ८०० वर्ष जुन्या या मंदिराला नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शरद पवारांच्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का; विश्वासू नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT