...तर श्रद्धाच्या जीव वाचला असता, मित्राने सांगितली काही महिन्यापूर्वीची घटना

श्रद्धाच्या हत्येपूर्वी तिचा प्रियकर आफताबने तिला अनेकदा मारहाण केल्याची माहिती तिच्या मित्रांनी दिली आहे.
Shraddha Murder Cas
Shraddha Murder CasSaam TV
Published On

मुंबई : पालघरच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे भयानक खुलासे समोर येत आहे. आफताब पूनावालाचे क्रौर्य हळूहळू समोर येत आहे. मात्र तिला संभाव्य घातपाताचे संकेत आधीच मिळाले होते. याबाबत तिने तिच्या मित्रांना कळवलं होतं. मात्र वेळेत काही सकारात्मक हालचाली झाल्या असत्या तर श्रद्धा वालकरसोबत असा अनुचित प्रकार कदाचित घडला नसता. (Crime News)

श्रद्धाच्या हत्येपूर्वी तिचा प्रियकर आफताबने तिला अनेकदा मारहाण केल्याची माहिती तिच्या मित्रांनी दिली आहे. जेव्हा श्रद्धाला समजले की तिच्या जीवाला धोका आहे त्यावेळी तिने सावध होत मित्रांकडे मदत मागितली होती. (Latest marathi News)

Shraddha Murder Cas
Delhi Crime Case : श्रद्धा खून प्रकरणात नवा ट्विस्ट; बद्री नावाची 'ती' महिला कोण?

इंडिया टुडेशी बोलताना श्रद्धाचा मित्राने सांगितलं की, त्या दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे. एकदा तिने मला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला आणि मला त्याच्या घरातून घेऊन जाण्यास सांगितले. मी आफताबसोबत राहिले तर तो मला मारून टाकेल. त्यावेळी तिला त्याच्या घरातून आम्ही आणले होते. आम्ही आफताबला पोलिसांत तक्रार करू, असा इशाराही दिला होता. मात्र श्रद्धाच्या सांगण्यावरून तसं केले नाही.

Shraddha Murder Cas
काळजाचा थरकाप उडवणारी घटना; प्रेयसीची हत्या करत शरीराचे केले ३५ तुकडे

त्याच मित्राने ऑगस्ट महिन्यात श्रद्धाच्या भावाला सांगितले होते की ती अडीच महिन्यांपासून तिच्या मित्रांच्या संपर्कात नाही. श्रद्धाच्या भावाने हा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी माणिकपूर पोलिस ठाण्यात श्रद्धा गायब असल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान, आफताबच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी 2019 मध्ये श्रद्धाला अनेक वेळा पूनावालाच्या घरी जाताना पाहिले होते.

श्रद्धा आणि आफताब दोघेही वसई येथे राहत होते. आफताब आधी एकगा कॉल सेंटरमध्ये काम करायचा आणि नंतर एका आयटी कंपनीत काम करू लागला. ऑक्टोबर 2019 मध्ये या दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र याला घरच्यांचा विरोध होता. त्यानंतर दोघेही दिल्लीला जाऊन राहू लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com