Delhi Crime News : दिल्लीत काळीज सुन्न करणारी एक भयंकर घटना घडली आहे. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केले त्याच प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून तिची हत्या केली. फक्त हत्या करुन तो थांबला नाही तर पुढे प्रेयसीच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडेही केले. दिल्ली येथील मेहरौली परिसरात ही घटना घडली आहे.
काल दिवसभर देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा खून प्रकरणामध्ये आता आणखी एक नवीन खुलासा समोर आलेला आहे. या प्रकरणामध्ये आता बद्री नावाच्या एका मुलीचं नाव पुढे येत आहे. आफताब तिला डेट करत असल्याचं सांगण्यात येत येत. त्याने तिला त्याच रुमवर बोलावलं होतं, ज्या रुममध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते.
मुंबईतील आफताब अमीनसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाच्या हत्येमागील खरे कारण काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा असल्याचे बोलले जात आहे. दोघेही एकमेकांवर संशय घेऊ लागले. दोघांमध्ये रोज भांडण व्हायचे. आफताब श्रद्धाला मारहाण करायचा, असा आरोप श्रद्धाच्या नातेवाईकांनी केला आहे.
आफताबने श्रद्धाला का मारले?
ही घटना ६ महिन्यांपूर्वी घडली. मुंबईत कॉल सेंटरमध्ये ( Call Center) श्रध्दा आणि आफताब हे दोघे काम करत होते. दोघांची चांगली मैत्री झाली होती. नंतर ही मैत्री प्रेमात बदलली. श्रध्दाने या विषयी तिच्या घरी सांगितल्यावर घरच्यांनी त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे दोघांनी मुंबईहून दिल्ली गाठली. दोघेही लिव इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यामुळे आपल्या प्रेमाला पती पत्नीचे नाव मिळावे असे श्रध्दाचे मत होते. ती सतत आफताबला लग्नासाठी विचारत होती.
मात्र आफताबला तिच्याशी लग्न करायचे नव्हते त्यामुळे सुरूवातीला त्याने श्रध्दाला खूप टाळले. नंतर या विषयावरून त्यांच्यात खूप वाद होऊ लागले. अशात १८ मे रोजी या दोघांचे खूप जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात आफताबने श्रध्दावर चाकूने वार केले. खून केल्यावर आफताबने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याचा खूप विचार केला. त्याने मृतदेहाचे एकूण ३५ तुकडे केले. हे सर्व तुकडे त्याने १८ दिवस घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज मध्य रात्री तो यातील काही तुकडे जंगलात ( Forest) नेऊन टाकत होता अशी महिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.
पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी ८ नोव्हेंबर रोजी मुलीच्या अपहरणाची तक्रार दिल्लीतल्या महरौली ठाण्यात दिली होती. आरोपी आफताब अमीन पुनावाला याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.