ED Summons To Arvind Kejriwal Saam TV
देश विदेश

ED on Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स, न्यायालयानेही नोटीस बजावली; हजर न झाल्यास काय होईल कारवाई?

ED Summons To Arvind Kejriwal: दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना आणखी एक समन्स पाठवले आहे.

Satish Kengar

ED Summons To Arvind Kejriwal:

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना आणखी एक समन्स पाठवले आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवाल यांना सहावे समन्स बजावले आहे.

ईडीने केजरीवाल यांना 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. असं असलं तरी केजरीवाल आतापर्यंत ईडीने बजावलेल्या सर्व समन्सकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत नुकतीच ईडीने न्यायालयात धाव घेतली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना याआधी पाच समन्स पाठवण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी या समन्सला कोणतेही योग्य उत्तर दिलेले नाही. केजरीवाल अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. 7 फेब्रुवारीला ईडीने या प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी केली. तसेच अरविंद केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. (Latest Marathi News)

आता पुन्हा एकदा केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहावे समन्स जारी केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. केजरीवाल यांना 19 फेब्रुवारी रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

यापूर्वी केजरीवाल यांना या वर्षी 2 फेब्रुवारी, 18 जानेवारी आणि 3 जानेवारी आणि 2023 मध्ये 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर या तारखांना बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी नियोजित दौऱ्यांचं कारण देत ईडी चौकशीला सामोरी जाण्यास टाळले. मात्र यावेळी ते हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

AAP: 'न्याय मिळण्याची अपेक्षा संपली'; केजरीवालांचा न्यायाधीशांच्या निष्पक्षतेवरच सवाल

यंदा उष्माघातानं लाखो बळी जाणार? जगावर पुन्हा 'सुपर एल निनो'चं संकट?

Investment Scheme:भरघोस रिटर्न्ससाठी सरकारची नवी योजना? 22 हजार गुंतवा, साडेतीन लाख कमवा?

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

SCROLL FOR NEXT