Vibhakar Shastri: काँग्रेसला आणखी एक धक्का, लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

Vibhakar Shastri Join BJP: काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. लखनौमध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Vibhakar Shastri Join BJP
Vibhakar Shastri Join BJPSaam Tv
Published On

Vibhakar Shastri Join BJP:

काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. लखनौमध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीत विभाकर शास्त्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विभाकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

विभाकर शास्त्री म्हणाले की, मला वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या संकल्पनेला अधिक बळ देऊन देशाची सेवा करू शकेन.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vibhakar Shastri Join BJP
Rajya Sabha Election: भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; अशोक चव्हाण यांना संधी तर राणेंना डावललं

विभाकर शास्त्री म्हणाले की, ''भाजपचे माझ्यासाठी दरवाजे उघडल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शाह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ब्रजेश पाठक यांचे आभार मानू इच्छितो. पक्षनेतृत्वाच्या सूचनेनुसार मी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीची कोणतीही विचारधारा नाही, तर मोदींना हटवणे हाच त्यांचा उद्देश आहे. काँग्रेसची विचारधारा काय आहे हे राहुल गांधी यांनी सांगावं.''  (Latest Marathi News)

याआधी, विभाकर शास्त्री यांनी बुधवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी ट्विटवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याना एक पोस्ट टॅग करत आपला राजीनामा जाहीर केला. यात विभाकर शास्त्री म्हणाले, "आदरणीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी, मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.'' विभाकर शास्त्री हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव राहिले आहेत.

Vibhakar Shastri Join BJP
Narayan Rane News: मनोज जरांगेंच्या 'त्या' इशाऱ्यानंतर नारायण राणे भडकले; थेट ट्वीट करत साधला निशाणा

दरम्यान, याआधी महाराष्ट्रात ही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com